Join us

​प्राचीसाठी‘नाजूक मुली’ची इमेज ठरतेय घातक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2016 11:16 IST

अभिनेत्री प्राची देसाईला स्वत:ची इमेज घातक ठरू लागली आहे. ‘नाजूक मुलगी’ या इमेजमधून बाहेर पडण्यासाठी ती संघर्ष करीत असल्याचे ...

अभिनेत्री प्राची देसाईला स्वत:ची इमेज घातक ठरू लागली आहे. ‘नाजूक मुलगी’ या इमेजमधून बाहेर पडण्यासाठी ती संघर्ष करीत असल्याचे तिने कबूल केले. प्राची देसाईने 2008 साली प्रदर्शित झालेल्या ‘रॉक आॅन’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. ‘रॉक आॅन 2’मध्येही प्राचीची भूमिका होती हे विशेष. प्राची म्हणाली, ‘रॉक आॅन’नंतर माझी एक खास प्रतिमा तयार झाली. याचे सर्र्वांत मोठे कारण म्हणजे मी टेलीव्हिजनच्या पार्श्वभूमीतून आले होते, दुसरे म्हणजे मी कधीच ग्लॅमरस आणि अति काल्पनिक भूमिका केल्या नव्हत्या. ‘रॉक आनॅ’मध्ये काम करण्यापूर्वी मी एकता कपूरच्या ‘कसम से’म या मालिकेत पारंपरिक व नाजूक मुलीच्या भूमिकेत होते. आपल्या करिअर विषयी प्राचीने सांगितले, माझी सुरुवात लहान बजेटच्या चित्रपटातून झाली नाही, मी येथे कायम केलेली प्रतिमा माझा पिच्छा पुरवित आहे. मला वेगळ्या भूमिका मिळाल्या नाहीत. मी जेव्हा 19 वर्षांचे होते तेव्हा मी ‘रॉक आॅन’मध्ये काम केले. मात्र मला बड्या चित्रपट निर्मात्यांकडून असामान्य प्रतिक्रिया मिळाल्या. यानंतर मला जे लोक भेटले त्यांनी मला कमी वयाच्या भूमिका आॅफर केल्या यातही मी नाजूक साजूक मुलीची भूमिका साकारावी अशी त्यांची इच्छा होती. प्राची म्हणाली, मी जशी दिसते तशी नाहीच मी त्याच्या अगदी उलट आहे. स्टारकिड्सना सहज यश मिळते यावर प्राची म्हणाली, सिनेमाची पाश्वभूमी नसलेल्या कलाकारांना येथे संघर्ष करावाच लागतो, मग ती विद्या बालन असो किंवा कंगना रानौत असो सर्वांनी यश मिळविण्यासाठी बराव वेळ घेतला. त्यांना चांगल्या कथा व चांगल्या भूमिका साकारण्यास मिळाल्या. तुम्हाला कायम मेहनत करावी लागते असेही ती म्हणाली. ‘रॉक आन 2’ च्या सिक्वलमध्ये वेटेज न मिळाल्यामुळे प्राची नाराज असल्याचे सांगण्यात येत होते.