Join us  

बालकलाकार म्हणून झनक शुक्ला झाली होती प्रसिद्ध, आता २५ वर्षातही मिळत नाही काम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2021 4:39 PM

'कल हो ना हो' या सिनेमात झनक शुक्लाने जियाची भूमिका साकारली होती.या सिनेमात झनकने प्रीती झिंटाच्या लहान बहिणीची भूमिका साकारली होती.

छोट्या पडद्यावर १९ वर्षांपूर्वी एका बालअभिनेत्रीनं रसिकांवर मोहिनी घातली होती. तिचं कधी निरागस कधी खोडकर असणं रसिकांना भावलं होतं. ‘करिश्मा का करिश्मा’ आणि सोनपरी या मालिकेतील तिचा अभिनय रसिकांना भावला. ९०च्या दशकात बालकलाकार म्हणून ती प्रसिद्धीच्या शिखरावर होती. ती बालकलाकार म्हणजे झनक शुक्ला. 

‘करिश्मा का करिश्मा’ या मालिकेत झनकने रोबोटची भूमिका साकारली होती. तिची ही भूमिका बच्चेकंपनीसह तमाम रसिकांना भावली होती. बालपणीच आपल्या अभिनयाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी झनक अचानक पडद्यापासून दूर गेली. सोनपरी मालिकेनंतर  रसिकांना तिचं दर्शन झालं नाही.

'कल हो ना हो' या सिनेमात झनक शुक्लाने जियाची भूमिका साकारली होती.या सिनेमात झनकने प्रीती झिंटाच्या लहान बहिणीची भूमिका साकारली होती. ‘कल हो न हो’ या सिनेमाव्यतिरिक्त झनकने 'डेडलाइन: सिर्फ 24 घंटे' या सिनेमातसुद्धा काम केले आहे.नुकत्याच दिलेल्या एका मुलखातीत तिने सांगितले होते की, मी आता २५ वर्षांची झाली आहे. मी काहीच कमवत नाहीय.

मी काहीच काम करत नसल्यामुळे याच वयात रिटायर्ड झाल्याचे माझे आई-वडिल मला बोलतात.झनक 'कुमकुम भाग्य' या मालिकेतील अभिनेत्री सुप्रिया शुक्ला आणि डॉक्यूमेंट्री फिल्म मेकर हरी शुक्ला यांची मुलगी आहे. अभिनयाच्या क्षेत्रात परतण्याचा झनकचा तूर्तास तरी कोणताही इरादा नसला तरी  एका सिनेसाठी बोलणी सुरु असल्याचेही तिने म्हटले आहे.

 

तुर्तास तरी ती आपला बराच वेळ मित्रमैत्रिणींसह घालवते. भविष्यात झनकला सामाजुक कार्य करायची इच्छा आहे. इन्स्टाग्रामवर तिचे बरेच फॉलोअर्स आहेत. इनस्टाग्रामवर झनकचे बरेच फोटो असून त्यात तिला ओळखणं कठीण आहे. 

टॅग्स :झनक शुक्ला