iifa awards-2017 : आयफा अवार्डचे काही रंगीबेरंगी क्षण...!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:17 IST
यंदाचा १८ वा आयफा अवार्डच्या रंगीबेरंगी सोहळ्याची सांगता झाली. पण अद्याप सोहळ्याची चर्चा संपलेली नाही. ग्रीन कार्पेटवरील बॉलिवूड सेलिब्रिटींचा स्टाईलिश अंदाज, आयफा सोहळा होस्ट करणारे सैफ अली खान, करण जोहरचे खिळवून ठेवणारे निवेदन, धम्मान परफॉर्मन्स आणि आयफा ट्रॉफी जिंकल्यानंतरचा विजयवीरांचा आनंदोत्सव हे सगळे डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. अभिनेत्री आलिया भट्ट हिला आयफा अवार्ड सोहळ्यात बेस्ट अॅक्ट्रेसच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. ‘उडता पंजाब’मधील अभिनयासाठी तिला हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी स्टाईलिश आलियाने प्रत्येकाचे मनापासून आभार मानलेत.
iifa awards-2017 : आयफा अवार्डचे काही रंगीबेरंगी क्षण...!!
यंदाचा १८ वा आयफा अवार्डच्या रंगीबेरंगी सोहळ्याची सांगता झाली. पण अद्याप सोहळ्याची चर्चा संपलेली नाही. ग्रीन कार्पेटवरील बॉलिवूड सेलिब्रिटींचा स्टाईलिश अंदाज, आयफा सोहळा होस्ट करणारे सैफ अली खान, करण जोहरचे खिळवून ठेवणारे निवेदन, धम्मान परफॉर्मन्स आणि आयफा ट्रॉफी जिंकल्यानंतरचा विजयवीरांचा आनंदोत्सव हे सगळे डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. अभिनेत्री आलिया भट्ट हिला आयफा अवार्ड सोहळ्यात बेस्ट अॅक्ट्रेसच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. ‘उडता पंजाब’मधील अभिनयासाठी तिला हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी स्टाईलिश आलियाने प्रत्येकाचे मनापासून आभार मानलेत.आयफा अवार्ड2017 च्या ग्रीन कार्पेटवर यंदा बॉलिवूड सेलिब्रिटींचा स्टाईलिश अंदाज पाहण्यासारखा होता. अभिनेता आदित्य राय कपूर हा ग्रीन कार्पेटवर उतरला आणि चाहत्यांनी त्याच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी एकच गलका केला. चाहत्यांचे हे प्रेम पाहून आदित्य सुखावला नसेल तर नवल! अभिनेत्री कल्की कोच्लिन पिंक कलरच्या आऊटफिटमध्ये ग्रीन कार्पेटवर उतरली. चाहत्यांनी तिच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली. आपल्या चाहत्यांना कल्की कसा बरे नकार देणार? अभिनेत्री शिल्पा शेट्टीने आपल्या युनिक स्टाईलने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. पत्नी मीरा व मुलगी मीशासोबत आयफा अवार्ड सोहळ्याला पोहोचलेला शाहिद कपूर सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला.‘उडता पंजाब’साठी त्याला बेस्ट अॅक्टरच्या अवार्डने गौरविण्यात आले. सलमान खान ‘आयफा अवार्ड’ सोहळ्याचा खºया अर्थाने ‘किंग’ ठरला. त्याच्या जबरदस्त परफॉर्मन्सने सोहळ्यात अशी काही रंगत आणली की, सगळेच त्याच्यावर फिदा झालेत. वरूण धवनला आयफा सोहळ्यात ‘बेस्ट अॅक्टर इन कॉमिक रोल’ पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याआधी वरूणचा धमाकेदार परफॉर्मन्स झाला. कॅटरिना कैफनेही धम्माल परफॉर्मन्स सादर केला. तिच्या परफॉर्मन्सवर अख्खे स्टेडियम नाचू लागले. पत्नी मीरा व मुलगी मीशासोबत आयफा अवार्ड सोहळ्याला पोहोचलेला शाहिद कपूर सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला.‘उडता पंजाब’साठी त्याला बेस्ट अॅक्टरच्या अवार्डने गौरविण्यात आले. आयफा अवार्ड2017 च्या ग्रीन कार्पेटवर यंदा बॉलिवूड सेलिब्रिटींचा स्टाईलिश अंदाज पाहण्यासारखा होता. अभिनेता आदित्य राय कपूर हा ग्रीन कार्पेटवर उतरला आणि चाहत्यांनी त्याच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी एकच गलका केला. चाहत्यांचे हे प्रेम पाहून आदित्य सुखावला नसेल तर नवल! अभिनेत्री कल्की कोच्लिन पिंक कलरच्या आऊटफिटमध्ये ग्रीन कार्पेटवर उतरली. चाहत्यांनी तिच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली. आपल्या चाहत्यांना कल्की कसा बरे नकार देणार? अभिनेत्री शिल्पा शेट्टीने आपल्या युनिक स्टाईलने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. आयफा ‘किंग’सलमान खान ‘आयफा अवार्ड’ सोहळ्याचा खºया अर्थाने ‘किंग’ ठरला. त्याच्या जबरदस्त परफॉर्मन्सने सोहळ्यात अशी काही रंगत आणली की, सगळेच त्याच्यावर फिदा झालेत. वरूण धवनला आयफा सोहळ्यात ‘बेस्ट अॅक्टर इन कॉमिक रोल’ पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याआधी वरूणचा धमाकेदार परफॉर्मन्स झाला. कॅटरिना कैफनेही धम्माल परफॉर्मन्स सादर केला. तिच्या परफॉर्मन्सवर अख्खे स्टेडियम नाचू लागले.