Join us  

'वयाच्या चाळीशीत मिळतं प्रेम तर...'; Arjun Kapoor सोबतच्या ब्रेकअपच्या चर्चेदरम्यान Malaika Aroraची लेटेस्ट पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 2:43 PM

मलायका अरोराची (Malaika Arora) इंस्टाग्रामवरील लेटेस्ट पोस्ट चर्चेत आली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor)च्या ब्रेकअपचे वृत्त समोर येत होते. मात्र अर्जुन कपूरने लेडी लव्ह मलायकासोबतचा एक फोटो शेअर करून या सर्व अफवांना पूर्णविराम लावला. आता मलायका अरोराने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने सांगितले आहे की, वयाच्या ४० व्या वर्षी कोणाला प्रेम मिळाले तर त्याकडे सामान्य दृष्टीकोणातून पाहा. वयाच्या २५ व्या वर्षी आयुष्य संपत नाही.

मलायका अरोराने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे, त्यात तिने म्हटले की, "नाही, हे खरंच आहे का. जर तुम्हाला वयाच्या ४० व्या वर्षी प्रेम मिळत असेल तर या गोष्टीकडे सामान्य दृष्टीकोनातून पाहा. वयाच्या तिशीत नवीन गोष्टींची स्वप्ने पाहणे आणि नवीन गोष्टींची इच्छा बाळगणे याकडे सहज दृष्टीकोनातून पाहा. वयाच्या पन्नाशीत आपल्या जीवनातील उद्देश मिळू शकतो किंवा तुम्ही शोधू शकता. या गोष्टीकडे देखील सामान्य दृष्टीकोनातून पाहा. वयाच्या २५ व्या वर्षी आयुष्य संपत नाही. असे वागणे थांबवा आणि जीवनात तुमच्या विचारसरणीत प्रगल्भता आणा."

याशिवाय अर्जुन कपूरने काही दिवसांपूर्वी मलायकासोबत शेअर केलेल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने चाहत्यांना स्पष्टपणे सांगितले की, तो अजूनही मलायका अरोरासोबतच आहे. दोघे वेगळे झालेले नाहीत. अर्जुनने लिहिले, "अफवांना जागा नाही. सर्वजण सुरक्षित रहा, आशीर्वाद द्या. लोकांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करा. मी तुम्हा सर्वांवर खूप प्रेम करतो." अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांची सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडप्यांमध्ये गणना केली जाते. ते दोघे अनेकदा सार्वजनिक ठिकाणी एकत्र पाहायला मिळतात. 

टॅग्स :मलायका अरोराअर्जुन कपूर