Join us  

"कामाच्या ठिकाणी मला छळले जायचे", सलमानच्या हिरोईनचा नेपोटिझमबाबत धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 11:55 AM

आतापर्यंत बॉलिवूडमध्ये असलेल्या घराणेशाहीबद्दल, कंगना रणौत, अभिनव कश्यप, रवीना टंडन, शेखर कपूर यासारख्या सेलिब्रेटींनी भाष्य केलं आहे.

सुशांतच्या निधनानंतर अनेक कलाकारांनी बॉलिवूडमध्ये सुरू असलेल्या नेपोटीझमवर आपली मत मांडत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. बॉलिवूडमध्येही घराणेशाहीच चालते. इथे केवळ कलाकरांच्याच मुलांना कामासाठी प्राधन्य दिले जाते. ज्यांना बॉलिवूडचा बँकग्राऊंड नाही अशा कलाकारांना नेहमीच डावलले जाते. त्यांना चांगले काम दिलेच जात नाही.नेहमी त्रास दिला जातो तर त्यामुळे अनेक कलाकार डिप्रेशनमध्ये जात आत्महत्यासारखे कठोर पाऊलं उचलतात.आतापर्यंत बॉलिवूडमध्ये असलेल्या घराणेशाहीबद्दल, कंगना रणौत, अभिनव कश्यप, रवीना टंडन, शेखर कपूर यासारख्या सेलिब्रेटींनी भाष्य केलं आहे. यानंतर सलमान खानची हिरोईनही पुढे आली आहे. ती अभिनेत्री आहे आयशा टाकिया ,आयशाने सांगितले की, माझ्याबरोबरही अशाच पद्धतीचा छळ करण्यात आला आहे.  

कामाच्या ठिकाणी मलाही  त्रास देण्याच्या घटना घडल्या आहेत. अशा गोष्टी वेळीच समोर आणणे गरजेचे आहे. जर एखाद्याने आपल्याला अशाप्रकारे मानसिक छळ करण्याचा किंवा लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न केला तर गप्प बसू नका, न घाबरता यावर बोलणे गरजेचे आहे. अशा घटना सहन न करता यावर आवाज उठवण्याची गरज आहे. तेव्हाच बॉलिवूडमध्ये लागलेली ही किड दूर होईल हे सांगत तिने सोशल मीडियावर एक पोस्टही शेअर केली आहे. 

आयशा टाकियाने ‘टार्जन द वंडर कार’ या २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या सिनेमातून आयशाने बॉलिवूड करिअरची सुरुवात केली. यांनतर 'डोर' या सिनेमात ती झळकली. २००९ मध्ये प्रदर्शित सलमान खान स्टारर ‘वॉन्टेड’ या सिनेमाने तिला खरी ओळख मिळवून दिली. 'दे ताली', 'संडे', 'फूल इन फायनल', 'शादी नंबर १' अशा अनेक सिनेमा ती झळकली आहे. लग्न झाल्यानंतर ती बॉलिवूडपासून दू झाली.

टॅग्स :आयशा टाकियासलमान खान