हुमाने का सोडला ‘गुलाब जामुन’??
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2016 10:42 IST
हुमा कुरेशी ही म्हणजे एक गुणी अभिनेत्री. ‘गँग आॅफ वासेपूर’, ‘बदलापूर’, ‘डेढ इश्किया’ आणि ‘हायवे’ सारख्या चित्रपटांत हुमाने तिच्या ...
हुमाने का सोडला ‘गुलाब जामुन’??
हुमा कुरेशी ही म्हणजे एक गुणी अभिनेत्री. ‘गँग आॅफ वासेपूर’, ‘बदलापूर’, ‘डेढ इश्किया’ आणि ‘हायवे’ सारख्या चित्रपटांत हुमाने तिच्या सशक्त अभिनयाने सगळ्यांची मने जिंकलीत. लवकरच हुमा ‘जॉली एलएलबी2’मध्ये दिसणार आहे. यातच हुमाने ‘गुलाब जामुन’ सोडला, अशी खबर आहे.आता ‘गुलाब जामुन’ सोडला म्हणजे, हुमाला तिचे वजन कमी करायचे असेल, असेच तुम्हाला वाटेल. पण तसे नाहीयं. आम्ही बोलतोय, ते मिठाईबद्दल नसून ‘गुलाब जामुन’ या चित्रपटाबद्दल. या चित्रपटात काम करण्यास हुमाने नकार कळवला आहे.आधी हुमा या चित्रपटाबद्दल बरीच उत्सूक होती. ‘गुलाब जामुन’ या चित्रपटाच्या नावाच्या तर ती प्रेमातच पडली होती. पण आता हुमाने हा चित्रपट सोडलाय. कारण काय?? तर चित्रपटाला होत असलेला विलंब. होय, गत जून महिन्यात या चित्रपटाचे शूटींग सुरु होणार होते. मात्र अद्यापही त्याचा थांगपत्ता नाही.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम करण्याची गरज होती. त्यामुळेच चित्रिकरण सुरु होऊ शकले नाही. हुमानेही बरीच प्रतीक्षा केली. पण कदाचित तिचाही संयम संपला आणि तिने सर्वेश मेरावा याच्या या चित्रपटाला नकार कळवला. सर्वेशचा हा दिग्दर्शक म्हणून पहिला डेब्यू सिनेमा आहे. आता हुमानंतर या चित्रपटात कुणाची वर्णी लागते, ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.अलीकडे हुमा व सोहेल खानच्या अफेअरची चर्चा बरीच रंगली होती. सोहेलसोबतची हुमाची जवळीक खान कुटुंबालाही खटकू लागली होती. काही दिवसांपूर्वीपर्यंत हुमा सलमान खानच्या कुटुंबातील प्रत्येक कार्यक्रमात हजर असायची.खान कुटुंबांतील सदस्य असावी, इतपत हुमा त्यांच्यात मिसळू लागली होती. खान कुटुंबाकडे कुठलाही कार्यक्रम असो, हुमाला त्याचे निमंत्रण असायचेच असायचे. मात्र मध्यंतरी खान फॅमिलीने हुमाला आपल्या घरी येण्यास बंदी घातली असल्याची खबर आली.