Join us  

हुमा कुरेशी अन् साकीब सलीमचा वाढला भाव, हातचा गमावला मोठा ब्रँड!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2018 8:41 AM

बॉलिवूडमध्ये भाऊ-बहिण किंवा बहिणी-बहिणींच्या अनेक जोड्या लोकप्रीय आहेत आणि अनेक मोठ-मोठे ब्रँण्ड आता या भावंडांची लोकप्रीयता कॅश करू पाहताहेत. 

बॉलिवूडमध्ये भाऊ-बहिण किंवा बहिणी-बहिणींच्या अनेक जोड्या लोकप्रीय आहेत आणि अनेक मोठ-मोठे ब्रँण्ड आता या भावंडांची लोकप्रीयता कॅश करू पाहताहेत. ताजे उदाहरण द्यायचे तर अभिनेत्री क्रिती सॅनन आणि तिची बहीण नुपूर सॅनन या दोघींचे देता येईल. अलीकडे क्रिती व नुपूर या दोघी बहिणी एका हेअर केअर ब्रँडची जाहिरात करताना दिसल्या होत्या. अशीचं एक संधी अभिनेत्री हुमा कुरेशी आणि तिचा भाऊ साकीब सलीम यांच्याकडेही चालून आली. एका ब्रँडने या बहीण-भावाला आपल्या जाहिरातीत घेण्याची तयारी दर्शवली . हुमा व साकीब या भावंडांनी ‘दोबारा- सी योर एविल’या चित्रपटात एकत्र काम केले होते. त्यामुळे संबंधित डीटीएच ब्रँडला या भावंडाकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. त्यांच्यामाध्यमातून आपल्या टीव्ही फॅमिली प्लान या ब्रँडला घराघरात पोहोचवायचा होता. पण ब्रँडचा हा प्लान अपयशी ठरला. होय, हुमा व साकीबने या जाहिरातीसाठी म्हणे इतकी मोठी रक्कम मागितली की, संबंधित ब्रँडचे डोळे पांढरे व्हायची वेळ आली. शिवाय इतकी मोठी रक्कम देऊन हुमा व साकीब यांना साईन करण्यापेक्षा त्याच रकमेत आम्ही करिना कपूर व करिश्मा कपूर या दोघी बहीणींना किंवा रणबीर कपूर व त्याची चुलत बहीण करिना कपूर यांना साईन करू, असेही या ब्रँडचे म्हणणे पडले. यात या ब्रँडचेही चुकलेले नाही. शेवटी हुमा कुरेशी दीर्घकाळापासून बॉलिवूडमधून गायब आहे. तिचा भाऊ साकीब यालाही म्हणावी तशी ओळख निर्माण करता आली नाहीये,हे वास्तव आहे आणि ते सगळेच जाणून आहेत.

टॅग्स :हुमा कुरेशी