Join us  

'गँग्स ऑफ वासेपूर'नंतर हुमा कुरेशीचं असं बदललं आयुष्य, खुलासा करत म्हणाली- यासाठी मला जास्त पैसे...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 12:12 PM

पहिल्या सिनेमासाठी किती मानधन मिळालं याचा खुलासा ही हुमाने या मुलाखती दरम्यान केला आहे.

हुमा कुरेशी म्हणजे बॉलिवूडची एक हॉट आणि ग्रेसफूल अभिनेत्री. हुमाचे लूक्स, स्टाईल आणि तिचे ग्लॅमर याविषयी नेहमीच चर्चा होत असते... हुमा कुरेशीचा 'तरला' नुकत्याच प्रदर्शित झाल्यामुळे ती सध्या चर्चेत आहे. 2012 मध्ये 'गँग्स ऑफ वासेपूर' या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हुमाने आता इतक्या वर्षांनी तिच्या डेब्यू सिनेमाबाबत मोठा खुलासा केला आहे. पहिला चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तिला हरवल्यासारखं वाटू लागलं होतं, असा खुलासा तिने केला आहे. 

एका मुलाखतीत हुमाने तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात आलेल्या अडचणींबद्दल सांगितले. हुमा म्हणाली, 'मला खूप आधीच यश मिळालं होतं. 2010 पर्यंत मी मुंबईला गेले आणि 2012 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि तो भारतात खूप गाजला पण माझं जग उद्ध्वस्त झाले.''

हुमाने पुढे सांगितलं, हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि हिट झाला, तेव्हा काय चालले आहे ते कोणालाच समजले नाही... 'मग मी म्हणालो, 'वाह! मी चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे का? माझा चेहरा होर्डिंगवर आहे?! यासाठी मला जास्त पैसे मिळायला हवे होते का? असे चित्रपट बनतात का?.'' तसेच 'गँग्स ऑफ वासेपूर' हा एक खास अनुभव होता आणि ज्याने तिचं आयुष्य बदललं. कारण त्यानंतर ती हरवली होती, तिला असुरक्षित वाटू लागल्याचं तिनं सांगितलं. 

'या चित्रपटासाठी मला फक्त 75,000 रुपये मानधन मिळाले होते... मी त्यांच्यासोबत (व्हायकॉम18) काम करत आहे, ते माझे निर्माते आहेत... पण तो माझा पहिलाच चित्रपट होता आणि त्यात काहीही फॅन्सी नाही.. तिथे कोणतेही पंचतारांकित हॉटेल नव्हते. व्हॅनिटी व्हॅन सीट किंवा लोकांची फौज तुमच्या मागे लागायला नव्हती.. फक्त एक ग्रुप होता जो तीन महिन्यांसाठी वाराणसीला गेला होता आणि शूटिंग करून परत आला होता..'' 

टॅग्स :हुमा कुरेशी