Join us

​‘हाफ गर्लफ्रेन्ड’चे नवे पोस्टर आले; ‘या’ तारखेला येणार ट्रेलर!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2017 11:29 IST

सध्या रोमॅन्टिक चित्रपटांचे दर्दी प्रेक्षक एकाच चित्रपटाकडे डोळे लावून बसले आहेत. हा चित्रपट म्हणजे, ‘हाफ गर्लफ्रेन्ड’. या चित्रपटाचे ट्रेलर ...

सध्या रोमॅन्टिक चित्रपटांचे दर्दी प्रेक्षक एकाच चित्रपटाकडे डोळे लावून बसले आहेत. हा चित्रपट म्हणजे, ‘हाफ गर्लफ्रेन्ड’. या चित्रपटाचे ट्रेलर कधी एकदा पाहायला मिळते, असे अनेकांना झाले आहे. तर अशा अनेकांसाठी आमच्याकडे एक आनंदाची बातमी आहे. होय, ‘ हाफ गर्लफ्रेन्ड’चे ट्रेलर येत्या १० एप्रिलला आऊट होणार आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाºया अर्जुन कपूरने ‘हाफ गर्लफ्रेन्ड’चे एक नवे पोस्टर शेअर करत ही गोड बातमी दिली.}}}} ‘हाफ गर्लफ्रेन्ड’ हा आगामी सिनेमा लेखक चेतन भगत याच्या  ‘हाफ गर्लफ्रेन्ड’ या नॉवेलवर आधारित आहे, हे तर तुम्हाला ठाऊक आहेच. आज अर्जुनने जारी केलेले चित्रपटाचे नवे पोस्टरही हेच सांगतेय. या पोस्टरमध्ये चेतन भगतच्या  ‘हाफ गर्लफ्रेन्ड’ नॉवेलच्या मुखपृष्ठाची अगदी हुबेहुब नक्कल केली गेली आहे. यापूर्वीच्या या चित्रपटाच्या पोस्टरवर अर्जुन कपूर व श्रद्धा कपूर या दोघांची ‘आशिक पोझ’ दिसली होती. आज जारी झालेल्या नव्या पोस्टरमध्ये मात्र अर्जुनपासून श्रद्धा दूर जाताना दाखवली गेली आहे. सगळ्या लव्हस्टोरीमध्ये असतो तसा एक टर्न या चित्रपटातही असावा, असा अंदाज यावरून आपण बांधू शकतो.ALSO READ : ‘हाफ गर्लफ्रेंड’ कॅटने का नाकारला, जाणून घ्यायचेय?मोहित सूरी दिग्दर्शित हा चित्रपट एकता कपूर व शोभा कपूर यांची निर्मिती आहे. येत्या मे महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणा-या या चित्रपटात एका बिहारी तरूणाची कथा दिसणार आहे.   बिहारच्या एका गावातून दिल्लीला शिकायला आलेला माधव आणि दिल्लीत राहणारी रिया यांच्यातील रोमान्स या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. चेतन भगतच्या कादंबरीवर आधारित चित्रपटात श्रद्धा प्रथमच काम करते आहे. याऊलट अर्जुनची ही दुसरी वेळ आहे. याआधी चेतन भगतच्या एका नॉवेलवर आधारित ‘२ स्टेट्स’मध्ये अर्जुन दिसला होता.