Join us
Daily Top 2Weekly Top 5

मोहेंजोदडोच्या अपयशाने हृतिक - आशुतोषचा वाद विकोपाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2016 12:15 IST

 मोहेंजोदडोच्या अपयशाने हृतिक - आशुतोषचा वाद विकोपाला जात असून अपयशाचे खापर दोघेही एकमेकांच्या डोक्यावर फोडत आहेत.  हा वाद चांगलाच ...

 मोहेंजोदडोच्या अपयशाने हृतिक - आशुतोषचा वाद विकोपाला जात असून अपयशाचे खापर दोघेही एकमेकांच्या डोक्यावर फोडत आहेत.  हा वाद चांगलाच विकोपाला जाण्याची शक्यता आहे.  मोहेंजोदडोचे टीजर रिलीज झाल्यानंतर अनेकांनी चित्रपटाचे कौतुक केले होते. प्रेक्षकांची उत्सुकताही वाढली होती. प्रत्यक्षात मात्र चित्रपट रिलीज झाल्यावर धाडकन आपटला. अक्षयच्या 'रुस्तुम'समोर तो टिकाव धरू शकला नाही. हृतिकने आशुतोषला वाईट भाषेत मेसेज करून याबाबत तूच कारणीभूत असल्याचे म्हटले, तर दुसरीकडे आशुतोषनेही त्याला त्याच भाषेत उत्तर देत अपयशाला तूच जबाबदार आहेस असे सुनावले आहे. हृतिक आणि आशुतोषला या चित्रपटाकडून भरपूर अपेक्षा होत्या.