Join us

​कसा साजरा होणार अभिषेक व ऐश्वर्याच्या लग्नाचा दहावा वाढदिवस?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2017 10:42 IST

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन हे कपल म्हणजे बॉलिवूडचे एक रोमॅन्टिक कपल. बघता बघता या दोघांच्या लग्नाला दहा ...

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन हे कपल म्हणजे बॉलिवूडचे एक रोमॅन्टिक कपल. बघता बघता या दोघांच्या लग्नाला दहा वर्षे पूर्ण झालेत. उद्या २० एप्रिलला ऐश्वर्या व अभिच्या लग्नाला दहा वर्षे पूर्ण होत आहेत. म्हणजे उद्या दोघेही आपल्या लग्नाचा दहावा वाढदिवस साजरा करणार आहेत. आता हे सेलिब्रेशन कसे होणार? हे जाणून घ्यायला आमच्याप्रमाणेच तुम्हीही उत्सूक असाल. पण यंदा कुठलेही सेलिबे्रशन नसणार. होय, ऐश्वर्याच्या वडिलांचे अलीकडेच निधन झाले आहे. त्यामुळे अभि -ऐश या दोघांनी आपला लग्नाचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यावर्षी जलसावर अभि-ऐशच्या मॅरेज अ‍ॅनव्हर्सरीचे सेलिब्रेशन नसेल.गतवर्षीचे आठवत असेल तर लग्नाच्या वाढदिवशी अभिषेकने ऐशसाठी एक मोठा संदेश लिहिला होता. ऐश आपल्या आयुष्यात किती महत्त्वाची आहे, हे त्याने या संदेशाद्वारे सांगितले होते. यंदाही अभिषेक आपल्या पत्नीसाठी असाच एखादा अविस्मरणीय  संदेश लिहिल, अशी आशा करूयात.ALSO READ : 24 वर्षापूर्वी अशी दिसायची ऐश्वर्या राय, पाहा Modelling Daysचे फोटोअभिषेक आणि ऐश्वर्या ही जोडी लवकरच आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार असल्याचीही खबर आहे. मणिरत्नम यांच्या चित्रपटात हे दोघेही पती-पत्नी मुख्य भूमिकेत असणार असल्याचे कळतेस. अर्थात अद्याप या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. यापूर्वी मणिरत्नम यांच्याच ‘गुुरू’ आणि ‘रावण’ या चित्रपटात ऐश्वर्या व अभिषेक एकत्र दिसले होते. खरे तर अभिषेक व ऐश्वर्या दोघेही एकत्र काम करण्यास उत्सूक आहेत. पण त्यासाठी एक दमदार स्क्रिप्ट असावी, असे अभिचे मत आहे. एखादी चांगली स्क्रिप्ट आली तर मी आणि ऐश निश्चितपणे एकत्र काम करू, असे अभिषेकने अलीकडे म्हटले होते.