Join us

HOT PICS: शाहरूख खानच्या सिग्नेचर पोझवर शिल्पा शेट्टीचा बेमालूम अंदाज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2018 13:30 IST

‘मैं हूँ ना’ म्हणत दोन्ही हात बाजूला करत चेहऱ्यावर क्यूट स्माईल करणारी या चित्रपटातील बॉलिवूडच्या बादशाह शाहरूख खानची सिग्नेचर ...

‘मैं हूँ ना’ म्हणत दोन्ही हात बाजूला करत चेहऱ्यावर क्यूट स्माईल करणारी या चित्रपटातील बॉलिवूडच्या बादशाह शाहरूख खानची सिग्नेचर पोझ आठवतेय ना? अर्थात या रोमँटिक हिरोच्या अशा अदांवर तर आपण फिदा आहोत. त्याच्यावर आजवर चाहत्यांनी प्रचंड प्रेम केलं. एवढंच काय पण, त्याच्यावर अनेक सेलिब्रिटींनीही प्रेम केलं. त्यात एक नाव म्हणजे अभिनेत्री शिल्पा शेट्टी. शाहरूखवरच्या प्रेमाचा लेटेस्ट दाखला द्यायचा झाल्यास तिने अशातच सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. त्यात ती शाहरूख खानची सिग्नेचर पोझ करताना दिसत आहे. तिने तिच्या बिझी शेड्यूलमधून थोडासा ब्रेक घेत ती बीचवर व्हेकेशनसाठी गेली आहे. यात ती बिकनी ड्रेसवर फारच हॉट दिसतेय. तिच्या या फोटोला अनेक  युजर्सनी बऱ्यावाईट कमेंटस दिल्या आहेत. नव्वदीच्या दशकांत शिल्पा शेट्टी हिने शाहरूख खानसोबत अनेक चित्रपटात काम केले आहे. त्यामुळे तिला त्याच्याकडून बरंच काही शिकायलाही मिळाले आहे. पण, अशातच तिने तिचा कुकींग शो टीव्हीवर सुरू केल्याने तिलाच फारसा वेळ नसल्याचे अनेकदा दिसून आले आहे. याशिवाय अनेक रिअ‍ॅलिटी शोमध्येही तिने परीक्षक म्हणून भूमिका बजावली आहे. ती आता मोठया पडद्यावर केव्हा दिसणार? याविषयी अलीकडेच तिला विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली,‘मी जर आता चित्रपटात काम केलं तर आत्तापर्यंत कधीही साकारली नसेल अशीच भूमिका स्विकारेन. मी एन्जॉय करेल अशाच भूमिका आता करणार आहे. तुम्ही जेव्हा टीव्ही करता तेव्हा तुम्हाला बराच स्कोप असतो. याउलट जेव्हा तुम्ही चित्रपट करता तेव्हा तुम्ही २५ दिवस किंवा त्यापेक्षाही जास्त दिवस अडकून जाता. पण हे देखील तितकेच खरे आहे की, एखादी चांगली स्क्रिप्ट जर मला मिळाली तर मी नक्कीच विचार करेन.’