Join us  

AR Rahman च्या पायांवर डोकं ठेवून हनी सिंहने घेतला आशीर्वाद, फॅन्स म्हणाले - किंग इज बॅक...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2022 4:08 PM

IIFA Awards 2022 : आयफा अवॉर्ड्समध्ये हनी सिंह आणि गुरू रंधावा दोघांनी सोबत परफॉर्म केलं. यावेळी लोकांना असं काही बघायला मिळालं जे बघून लोक अवाक् झाले.

पंजाबी गायक यो यो  हनी सिंह (Honey Singh) नुकताच अबुधाबीमध्ये आयफा अवॉर्ड्समध्ये (IIFA Awards 2022) सहभागी झाला होता. या अवॉर्ड शोमध्ये हनी सिंहने आपल्या वापसीची घोषणा केली. तो म्हणाला की, त्याची 10 नवीन  गाणी मार्केटमध्ये येणार आहेत. हनी सिंहने असं सांगितल्यावर अर्थातच इतर गायकांना घाम फुटला असेले. आयफा अवॉर्ड्समध्ये हनी सिंह आणि गुरू रंधावा दोघांनी सोबत परफॉर्म केलं. यावेळी लोकांना असं काही बघायला मिळालं जे बघून लोक अवाक् झाले.

आयफा अवॉर्ड्समध्ये समोरच्या सीटवर  संगीतकार ए.आर. रहमान बसले होते. हनी सिंह स्टेजवरून खाली उतरला आणि त्याने त्याचं डोकं ए.आर. रहमानच्या पायावर ठेवलं. ए.आर.रहमानने त्याला उठवलं, पण सर्व लोकांसमोर हनी सिंहने एआर रहमानकडून आशीर्वाद घेतला. याचाच व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.

फॅन्सने हनी सिंहचा हा भावूक करणारा व्हिडीओ पाहून त्याचं खूप कौतुक केलं. हनी सिंहने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'माझ्या आयुष्यातील स्पेशल मोमेंट. तोही ए.आर.रहमान सरसोबत'. फॅन्सनी या व्हिडीओवर कमेंट करत किंग इज बॅक अशा कमेंट केल्या. फॅन्स त्याच्या गाण्यांची आतुरतेने वाट बघत आहेत. 

आयफा अवॉर्ड्सबाबत सांगायचं तर यात म्युझिक इंडस्ट्रीतील अनेक मंडळी आले होते. नेहा कक्कर, तनिष्क बागची, हनी सिंह, गरू रंधावा. कंपोजर देवी श्री प्रसाद आणि ध्वानि भानूशाली यांचा यात समावेश आहे. सर्वांनी आयफा अवॉर्डच्या स्टेजवर धमाकेदार परफॉर्मन्स दिले. 

टॅग्स :हनी सिंहआयफा अॅवॉर्डए. आर. रहमान