हेजलने एका कंपनीवर लावले गंभीर आरोप!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2016 21:44 IST
सलमानचा ‘बॉडीगार्ड’ हा सिनेमा आठवतो? या सिनेमात सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारी हेजल कीच लवकरच क्रिकेटपटू युवराज सिंग याच्यासोबत विवाहबंधनात ...
हेजलने एका कंपनीवर लावले गंभीर आरोप!
सलमानचा ‘बॉडीगार्ड’ हा सिनेमा आठवतो? या सिनेमात सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारी हेजल कीच लवकरच क्रिकेटपटू युवराज सिंग याच्यासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. पण सध्या हेजल चर्चेत आहे ती वेगळ्याच एका कारणाने. होय, युनियन कॅश ट्रान्सफर फर्मवर तिने गंभीर आरोप केले आहेत. वेस्टर्न युनियनच्या जयपूर येथील शाखेत एका कर्मचाºयाकडून वंशभेदी वागणूक मिळाल्याचा आरोप हेजल किच हिने केला आहे. वेस्टर्न युनियनच्या कार्यालयात पियुष मिश्रा या व्यक्तीने मला वंशभेदी वागणूक दिली. माझे नाव हिंदूंसारखे वाटत नाही, म्हणून त्याने पैसे द्यायला नकार दिला, असे tweet करीत हेजलने याबद्दलचा संताप व्यक्त केला आहे. हा वाद वाढलेला बघून हेजलचा मंगेतर युवराज शांत कसा बरे बसेल? त्यानेही लगेच या वादात उडी घेतली. वेस्टर्न युनियनच्या कार्यालयात घडलेला हा प्रकार धक्कादायक आहे. अशाप्रकारचा वंशभेद खपवून घेता येणार नाही. वेस्टर्न युनियनकडून संबंधित कर्मचाºयावर कडक कारवाई करण्यात येईल, असे tweet त्याने केले.युवराज आणि हेजल यांचा २०१५मध्ये साखरपुडा झाला होता. मात्र, अजूनही या दोघांच्या लग्नाची तारीख निश्चित झालेली नाही. इंडोनेशियात बाली येथे बुधवारी दोन्ही कुटुंबियांच्या उपस्थितीत साखरपुडा झाला. गेली अनेक दिवस माध्यमांमधून दोघांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा होत होती