Join us  

बॉलिवूडची खरी ‘शोले गर्ल’ रेश्मा पठाण यांनी असा केला कास्टिंग काऊचचा सामना!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 10:35 AM

रेश्मा पठाण हे नाव तुम्ही क्वचितच ऐकले असेल. रेश्मा या भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्टंट वूमन म्हणून ओळखल्या जातात. ‘

ठळक मुद्देमला माझ्या गरिबीला हरवायचे होते. अशास्थितीत मी हार मानून चालणारे नव्हते, असेही रेश्मा म्हणाल्या.

रेश्मा पठाण हे नाव तुम्ही क्वचितच ऐकले असेल. रेश्मा या भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्टंट वूमन म्हणून ओळखल्या जातात. ‘शोले’ या गाजलेल्या चित्रपटात रेश्मा पठाण यांनीच हेमा मालिनी यांची बॉडी डबल बनून काही धोकादायक स्टंट सीन्स केले होते. ‘शोले’तील बसंतीचा टांग्याचा सीन दुस-या कुणी नाही तर हेमा मालिनी बनून रेश्मा यांनी केला होता. श्रीदेवी, डिम्पल कपाडिया आणि मीनाक्षी शेषाद्री सारख्या अनेक अभिनेत्रींच्या बॉडी डबलचे कामही रेश्मा यांनी केले आहे. वयाची साठी ओलांडलेल्या याच  रेश्मा पठाण यांनी इंडस्ट्रीतील कास्टिंग काऊचबद्दल काही धक्कादायक खुलासे केलेत.

आज काळ किती बदलला आहे, याने काहीही फरक पडत नाही. महिलांना कायम पुरुषांच्या गैरवर्तनाचा सामना करावा लागतोय. वयाच्या १४ व्या वर्षी मी स्टंट वूमन म्हणून काम सुरु केले. कुटुंबाचे पोट भरण्यासाठी मला हा मार्ग निवडावा लागला. या मार्गात अनेक चांगले लोक भेटलेत. तसेच वाईटही. मला अभिनय करायचा होता.  ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून मी काम सुरु केले. पण तू स्टंट कर ना, अभिनय तुला कसा जमेल? असे लोक मला म्हणायचे. हेच लोक काही वेळात तू किती सुंदर आहेत, हेही मला सांगायचे. काही जणांनी बेधडक माझ्यासमोर तडजोडीचे प्रस्ताव ठेवले. पण मी कुठलीही तडजोड केली नाही. मला माझे घर चालवायचे होते. त्यामुळे मी अतिशय चतूराईने प्रस्ताव देणाºयांपासून स्वत:ला दूर ठेवायचे, असे त्यांनी सांगितले. 

त्याकाळात  बॉलिवूड इंडस्ट्रीत पुरूषांचा दबदबा होता. १९६८ च्या त्या काळात सगळे अ‍ॅक्शन सीन्स पुरूषच करत. नट्याचे अ‍ॅक्शन सीन्सही महिलांचे कपडे घालून पुरुषच करत. अशा वातावरणात स्टंट वूमन म्हणून काम करणे, सोपे नव्हते. आजच्यासारखी लैंगिक समानताही नव्हती. पण मी हिंमत हरले नाही. मला माझ्या गरिबीला हरवायचे होते. अशास्थितीत मी हार मानून चालणारे नव्हते, असेही रेश्मा म्हणाल्या.

टॅग्स :रेश्मा पठाणहेमा मालिनी