Join us  

तुम्ही पाहिलात का श्रद्धा आणि सिद्धार्थचा बोल्ड अवतार?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2016 11:56 AM

OK Jaanu trailer :OK Jaanu : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि आदित्य राय कपूर या जोडीचा आॅनस्क्रीन रोमान्स ‘ओके जानू’मधून पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘आशिकी2’च्या सुपर सक्सेसनंतर या रोमॅन्टिक जोडीकडून प्रेक्षकांना भरपूर अपेक्षा आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर आऊट करण्यात आले होते. आज ‘ओके जानू’चा ट्रेलर रिलीज करण्यात आला.

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि आदित्य राय कपूर या जोडीचा आॅनस्क्रीन रोमान्स ‘ओके जानू’मधून पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘आशिकी2’च्या सुपर सक्सेसनंतर या रोमॅन्टिक जोडीकडून प्रेक्षकांना भरपूर अपेक्षा आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर आऊट करण्यात आले होते. आज ‘ओके जानू’चा ट्रेलर रिलीज करण्यात आला.‘ओके जानू’ हा चित्रपट ‘ओके कन्मनी’ या चित्रपटाचा अधिकृत रिमेक असल्याचे मानले जात आहे. आजच्या तरुणाईची मानसिकता हाताळत एका सुरेख प्रेमकथेचे चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे. आदि आणि तारा हे दोघेही आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी मुंबईत येतात आणि मुंबईत या दोघांची पहिली भेट प्रेमात बदलते. मात्र यानंतर लवकरच दोघांनाही आपआपल्या करिअरमुळे वेगळे व्हावे लागते. आदित्य आणि श्रद्धाची या चित्रपटातील कथा लिव्ह-इन रिलेशनशिप आणि याच्याशी संबंधित भावभावनांची कहाणी आहे.रोमॅन्टिक चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेले शाद अली यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून करण जोहर यांची निर्मिती आहे.नव्या वर्षांतील म्हणजे २०१७ मधील ‘ओके जानू’ हा पहिला रोमॅन्टिक चित्रपट असणार आहे. ‘ओके जानू’चा ट्रेलर बघता ‘आशिकी2’ची जोडी यात बºयाच बोल्ड अवतारात दिसत आहे. ट्रेलरमध्ये काही बेड सीन्स आणि किसींग सीन्सही दिसत आहेत. येत्या १३ जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. मात्र यामुळे या चित्रपटाला बॉक्सआॅफिसवरील कमाईसाठी केवळ १२ दिवस मिळणार आहेत. कारण यानंतर २५ जानेवारीला शाहरूख खानचा ‘रईस’ आणि हृतिक रोशनचा ‘काबील’ असे दोन चित्रपट एकाच दिवशी बॉक्सआॅफिसवर धडकत आहेत.