Join us  

‘क्लीन शेव’ मधील आमिर खान तुम्ही पाहिलाय? ‘लाल सिंग चढ्ढा’तील त्याचे लूक्स व्हायरल!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2020 6:32 PM

प्रोजेक्ट स्विकारताना त्यात आपली किती आणि कोणती भूमिका असणार आहे, याची तो विशेष काळजी घेतो. आता नुकतेच त्याचे ‘लाल सिंग चढ्ढा’ चित्रपटातील काही लूक्स समोर आले आहेत.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान असा अभिनेता आहे जो कोणतीही भूमिका कम्फर्ट झोनमध्ये आहे म्हणून करत नाही. दरवेळी प्रेक्षकांना काहीतरी नवीन देण्याचा त्याचा प्रयत्न असतो. प्रोजेक्ट स्विकारताना त्यात आपली किती आणि कोणती भूमिका असणार आहे, याची तो विशेष काळजी घेतो. आता नुकतेच त्याचे ‘लाल सिंग चढ्ढा’ चित्रपटातील काही लूक्स समोर आले आहेत. त्याचा हा अंदाज पाहून तुम्ही प्रेमात पडणारच...!!

आमिर खानला तुम्ही क्लीन शेव मध्ये तर पाहिले असेल पण त्याला आर्मी आऊटफिटमध्ये कधी पाहिलंय? या दोन्ही लूक्समध्ये बघण्याची तुमची इच्छा ‘लाल सिंग चढ्ढा’ या चित्रपटातील लूक्समुळे पूर्ण होणार आहे. नुकतेच त्याचे आर्मी लूक, क्लीन शेव आणि हॅण्डसम अवतारातील फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंना चाहत्यांची प्रचंड पसंती मिळताना दिसतेय. ‘लाल सिंग चढ्ढा’ हा आमिर खानचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. त्यासाठी तो प्रचंड मेहनत घेतोय.

सध्या तो याच चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. सध्या तो लुधियाना मध्ये चित्रपटाची शूटिंग करतो आहे. या फोटोंमध्ये त्याच्यासोबत एक महिला देखील उभी असल्याचे दिसून येतेय. त्याशिवाय शीख लूकमध्येही त्याचे काही फोटो व्हायरल झालेत. करिना कपूर खानही त्याच्यासोबत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 

‘लाल सिंंग चढ्ढा’ हा चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’ या १९९४ रोजी रिलीज झालेल्या चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वैत चंदन करत आहेत. करिनाची ही भूमिका यात महत्त्वपूर्ण असणार आहे.

टॅग्स :आमिर खानकरिना कपूर