Join us

Happy birthday Arshad Warsi : ​कधी करावे लागले सेल्समॅनचे काम, आज आहे लाखोंच्या बाईक्सचे कलेक्शन!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2018 11:13 IST

आपल्या ‘कॉमिक टाइमिंग’साठी ओळखला जाणारा अभिनेता अर्शद वारसी याचा आज (१९ एप्रिल) वाढदिवस. आज अर्शद ५० वा वाढदिवस साजरा ...

आपल्या ‘कॉमिक टाइमिंग’साठी ओळखला जाणारा अभिनेता अर्शद वारसी याचा आज (१९ एप्रिल) वाढदिवस. आज अर्शद ५० वा वाढदिवस साजरा करतोय. १९ एप्रिल १९६८ साली जन्मलेल्या या अभिनेत्याने अपार संघषार्नंतर बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.  पण त्याला खरी ओळख दिली ती २००३ साली आलेल्या ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ आणि यानंतर २००६ मधील ‘लगे रहो मुन्नाभाई’मधील सर्किट या भूमिकेने.आज अर्शदची नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही. पण एकेकाळी हाच अर्शद एका एका पैशासाठी मोताद होता. अर्शद १८ वर्षांचा असताना त्याचा वडिलांचा बोन कॅन्सरने मृत्यू झाला. वडिलाच्या मृत्यूनंतर दोन वर्षांतचं आईनेही साथ सोडली. अर्शदचे शालेय शिक्षण महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात झाले. मात्र गरिबीमुळे दहावीनंतर त्याने शिक्षण सोडून दिले.याकाळात पैशाची गरज होती. मग काय, अर्शदने  घरोघरी जावून सौंदर्य प्रसाधने विकण्याचे काम स्वीकारले. इतकेच नाही तर त्याने फोटो लॅबमध्येही काम केले.याचकाळात एका डान्स ग्रूपमध्ये तो सहभागी झाला. यानंतर अर्शदचे नशीब त्याला एका वेगळ्याच वळणावर घेऊन गेले. या वळणावर त्याची बॉलिवूडमध्ये एन्ट्री  झाली. अभिनेत्याशिवाय अर्शद एक चांगला कोरिओग्राफरही आहे. १९९३ मध्ये ‘रूप की रानी चोरों का राजा’चे टायटल ट्रॅक कोरिओग्राफ करण्याची संधी त्याला मिळाली.  हा चित्रपट आपटला पण ‘रोमिया नाम मेरा’ हे अर्शदने कोरिओग्राफ केलेले गाणे मात्र तुफान लोकप्रीय झाले होते. अर्शदने अमिताभ बच्चन यांची कंपनी एबीसीएलद्वारे बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, अर्शदला जया बच्चन यांनी ‘तेरे मेरे सपने’ची आॅफर दिली होती. १९९६ साली प्रदर्शित झालेल्या ‘तेरे मेरे सपने’ या चित्रपटामध्ये सह-नायकाची भूमिका करून अर्शद हिट झाला. यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. राजकुमार हिरानीच्या ‘मुन्ना भाई एम.बी.बी.एस.’आणि ‘लगे रहो मुन्ना भाई’या विनोदी चित्रपटांमधील सर्किटच्या भूमिकेमुळे अर्शद वारसी खºया अर्थाने प्रकाशझोतात आला. पुढे ‘इश्किया’, ‘जॉली एल.एल.बी.’ या चित्रपटांमधील भूमिकांसाठी देखील त्याचे कौतुक झाले.  अर्शदची पत्नी मारिया एक व्हीजे आहे. दोघांचीही भेट एका डान्स अ‍ॅॅकेडमीत झाली होती. दोघांमध्येही प्रेम फुलले आणि १९९९ मध्ये दोघांचे लग्न झाले. आज त्यांना दोन मुले आहेत.अर्शदला स्पोर्ट गाड्यांची प्रचंड आवड आहे. अलीकडे अर्शदने डुकाटी मॉन्सटर खरेदी केली. या गाडीची किंमत ८ लाख रूपयांच्या घरात आहे. अर्शदकडे अशा अनेक महागड्या बाईक्सचे कलेक्शन आहे.ALSO READ : सेल्फीवेड्या चाहत्यांमुळे ‘या’ अभिनेत्याच्या पत्नीला काढावा लागला पळ, पाहा व्हिडीओ!