Join us  

​‘हाफ गर्लफ्रेन्ड’चे नवे गाणे ‘लॉस्ट विदाऊट यू’ रिलीज !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2017 9:35 AM

अर्जुन कपूर आणि श्रद्धा कपूर यांचा आगामी चित्रपट ‘हाफ गर्लफ्रेन्ड’चे नवे गाणे ‘लॉस्ट विदाऊट यू’ आज रिलीज झाले.

अर्जुन कपूर आणि श्रद्धा कपूर यांचा आगामी चित्रपट ‘हाफ गर्लफ्रेन्ड’चे नवे गाणे ‘लॉस्ट विदाऊट यू’ आज रिलीज झाले. या गाण्यात अनेक इमोन्शन तुम्हाला पाहायला मिळतील. अर्जुन श्रद्धाला शोधतोय आणि तिला प्रचंड मिस करतोय. मला न्यूयॉर्कच्या लोकांसमोर लाइव्ह गाणे गायचे आहे, असे श्रद्धा अर्जुनला म्हणते आणि यानंतर अर्जुनला न्यूयॉर्कच्या प्रत्येक गायकाच्या चेहºयात केवळ आणि केवळ श्रद्धाचाच चेहरा दिसतो, असे गाण्याच्या व्हिडिओत दिसतेयं. हे गाणे तुम्हाला नक्की आवडेल, हे आम्ही दाव्यानिशी सांगतोय. कारण गाण्याचे बोल, संगीत सगळेच कर्णमधूर आहे. एमी मिश्रा आणिअनुष्का साहनी या दोघांनी हे गाणे गायले आहे. याआधी या चित्रपटाची दोन गाणी रिलीज झाली आहे. या गाण्यांना प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिलाय. चित्रपटातील ‘बारीश’ हे गाणे तर गेल्या कित्येक आठवड्यापासून नंबर वनवर आहे.श्रद्धाने या चित्रपटात एका बिनधास्त मुलीची भूमिका साकारली आहे. मोहित सूरी दिग्दर्शित हा चित्रपट लेखक चेतन भगत यांच्या ‘हाफ गर्लफ्रेन्ड’ या नॉवेलवर आधारित आहे. या चित्रपटात एका बिहारी तरूणाची कथा दिसणार आहे.   बिहारच्या एका गावातून दिल्लीला शिकायला आलेला माधव आणि दिल्लीत राहणारी रिया यांच्यातील रोमान्स या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. चेतन भगतच्या कादंबरीवर आधारित चित्रपटात श्रद्धा प्रथमच काम करते आहे. याऊलट अर्जुनची ही दुसरी वेळ आहे. याआधी चेतन भगतच्या एका नॉवेलवर आधारित '२ स्टेट्स'मध्ये अर्जुन दिसला होता. ‘हाफ गर्लफ्रेन्ड’मध्ये लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. या चित्रपटासोबत इरफान खानचा ‘हिंदी मीडियम’ हा सिनेमाही रिलीज होतो आहे.