जबरदस्त अॅक्शन; दमदार डायलॉग ! ‘टायगर जिंदा है’चा ट्रेलर आला!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2017 12:21 IST
अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली. होय, सलमान खान आणि कॅटरिना कैफ स्टारर ‘टायगर जिंदा है’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचा ट्रेलर आज अगदी काही क्षणांपूर्वी आऊट झाला.
जबरदस्त अॅक्शन; दमदार डायलॉग ! ‘टायगर जिंदा है’चा ट्रेलर आला!!
अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली. होय, सलमान खान आणि कॅटरिना कैफ स्टारर ‘टायगर जिंदा है’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचा ट्रेलर आज अगदी काही क्षणांपूर्वी आऊट झाला. २०१२ मध्ये आलेल्या ‘एक था टायगर’ या सुपरडुपर हिट चित्रपटातील सलमान व कॅटची केमिस्ट्री लोकांना प्रचंड भावली होती. त्यामुळे या जोडीला पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्यास चाहते उत्सूक होते. ‘टायगर जिंदा है’मध्ये पुन्हा एकदा सलमान व कॅटची तिचं शानदार केमिस्ट्री आपण पाहू शकणार आहोत आणि ‘टायगर जिंदा है’चा ट्रेलर याचा पुरावा आहे. ‘टायगर जिंदा है’च्या ट्रेलरची सुरवात होते ती इराकपासून. ‘जबसे दुनिया बनी है तबसे हर कोने में सिर्फ एक ही जंग हुई है सही और गलत की... रोशनी और अंधेरे की...’, हा ट्रेलरमधील पहिलाच डायलॉग मनं जिंकून घेतो. टायगर पुन्हा एकदा आपल्या त्याच अंदाजात परतल्याचे हा ट्रेलर पाहिल्यानंतर जाणवते. बंदी बनवण्यात आलेल्या २५ परिचारिकांना वाचवण्याच्या मिशनवर निघालेला टायगर यात दिसतो. ‘एक था टायगर’ची कथा संपली होती, तिथून ‘टायगर जिंदा है’ची कथा सुरू होते, असे ट्रेलर पाहिल्यानंतर जाणवते. टायगरच्या जबरदस्त अॅक्शन स्टंटशिवाय या चित्रपटात अनेक नव्या गोष्टी पाहायला मिळतील, याचा अंदाजही ट्रेलर पाहिल्यानंतर येतो. ट्रेलरमध्ये कॅटरिना कैफ ही सुद्धा अॅक्शन अवतारात दिसलीय. ट्रेलरमध्ये अनेक धोकादायक अॅक्शन सीन्स करताना तिला दाखवले गेले आहे.ALSO READ: सलमान खानच्या ‘टायगर जिंदा है’चे थीम साँग निघाले चोरीचे!एकंदर काय तर, ‘टायगर जिंदा है’चा ट्रेलर पाहिल्यानंतर सलमान पुन्हा त्याच्या खास अंदाजात परतल्याचे स्पष्ट होते. ट्रेलरमधील सलमानचा एक डायलॉग अंगावर शहारे आणतो. ‘शिकार तो सभी करते है लेकिन टाइगर जैसा शिकार कोई नहीं कर सकता है,’ हा तो डायलॉग आहे.‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट ‘एक था टायगर’चा सीक्वल आहे. सलमान व कॅटरिना कैफचा ‘एक था टायगर’ हा चित्रपट कबीर खानने दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट तुफान गाजला होता. पण हा चित्रपट कबीरऐवजी अली अब्बास जफर दिग्दर्शित करतो आहे.