डान्सिंग अंकलच्या डान्सवर आता गोविंदाने दिली ही प्रतिक्रिया!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2018 17:24 IST
सोशल मीडियावर आपल्या डान्सने लोकांना वेड लावणाºया डान्सिंग अंकल अर्थात संजीव श्रीवास्तव यांनी केवळ सर्वसामान्यांनाच आपले चाहते केले नसून, ...
डान्सिंग अंकलच्या डान्सवर आता गोविंदाने दिली ही प्रतिक्रिया!
सोशल मीडियावर आपल्या डान्सने लोकांना वेड लावणाºया डान्सिंग अंकल अर्थात संजीव श्रीवास्तव यांनी केवळ सर्वसामान्यांनाच आपले चाहते केले नसून, मोठ-मोठे सेलिब्रिटीही त्यांचे चाहते होताना दिसत आहेत. अभिनेत्री रविना टंडन असो वा अभिनेता अर्जुन कपूर या सर्वांसह अनेक सेलिब्रिटी त्यांच्या डान्सचे कौतुक करताना दिसत आहेत. आता या यादीत अभिनेता गोविंदा याच्याही नावाचा समावेश झाला आहे. वास्तविक गोविंदाच्या चित्रपटातील एका गाण्यामुळेच डान्सिंग अंकल रातोरात प्रसिद्धीझोतात आले आहेत. आता गोविंदानेच त्यांच्या डान्सवर पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. डान्सिंग अंकलचा व्हिडीओ जेव्हा गोविंदाच्या व्हॉट्स अॅपवर झळकला तेव्हा त्याने लगेचच त्यावर प्रतिक्रिया दिली. ‘आज तक’ला दिलेल्या एका मुलाखतीत गोविंदाने सांगितले की, माझ्या एका ओळखीच्या मित्राने मला हा व्हिडीओ पाठविला होता. मी हा व्हिडीओ माझ्या पत्नीलाही दाखविला. त्यावेळी गोविंदा लंडन येथील एका लग्नास उपस्थित होता. डान्सिंग अंकलच्या डान्सवर प्रतिक्रिया देताना गोविंदाने सांगितले की, अंकलजीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे पूर्ण लक्ष केवळ डान्सवर असते. आजूबाजूला असलेल्या लोकांना बघून त्यांचा अजिबातच गोंधळ होत नाही. आम्हाला कोरिओग्राफरच्या इशाºयावर डान्स करावा लागतो, परंतु अंकलजीने कमालच केली, असे म्हणावे लागेल. पुढे बोलताना गोविंदाने म्हटले की, ‘अजूनही माझी कोणीतरी कॉपी करीत आहे हे जेव्हा माझ्या निदर्शनास येते तेव्हा खून आनंद होतो. माझी अशी अपेक्षा आहे की, त्यांनी असेच मनसोक्त नृत्य करून आयुष्याचा आनंद घ्यावा.’ दरम्यान, डान्सिंग अंकलने गोविंदाच्याच ‘आप के आ जाने से...’ या गाण्यावर डान्स करून सर्वत्र धमाल उडवून दिली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नीनेही ठेका धरल्याचे दिसून येत आहे. जेव्हा डान्सिंग अंकल डान्स करतात तेव्हा जणूकाही ते गोविंदालाच टक्कर देत असावेत, असे दिसते. सध्या या अंकलचे एक नव्हे तर तीन व्हिडीओ समोर आले आहेत.