Join us  

गोविंदाचा मुलगा यशवर्धनने सुरु केली बॉलिवूडची तयारी! पाहा, फोटो!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2019 10:21 AM

होय, गोविंदाचा मुलगा यशवर्धन बॉलिवूडमध्ये येण्यास सज्ज आहे. याचा पुरावा हवा असेल तर यशवर्धनने त्याच्या सोशल अकाऊंटवर पोस्ट केलेला एक ताजा फोटो तुम्ही बघायलाच हवा

ठळक मुद्देमध्यंतरी यशवर्धन निर्माता साजिद नाडियाडवालाच्या बॅनरखाली फिल्ममेकिंगचे धडे गिरवत असल्याची बातमी आली होती.

बॉलिवूडचा ‘हिरो नंबर 1’ गोविंदा याच्या फिल्मी करिअरला आताश: ओहोटी लागली आहे. अलीकडच्या काळात गोविंदा अनेक नव-नवे चित्रपट घेऊन आला. पण ते सर्वचं फ्लॉप ’ठरलेत. नुकताच रिलीज झालेला त्याचा ‘रंगीला राजा’ हा चित्रपटही दणकून आपटला. अर्थात तरिही गोविंदा हार मानायला तयार नाही. विशेष म्हणजे आता गोविंदा आपल्या मुलालाही बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. होय, गोविंदाचा मुलगा यशवर्धन बॉलिवूडमध्ये येण्यास सज्ज आहे. याचा पुरावा हवा असेल तर यशवर्धनने त्याच्या सोशल अकाऊंटवर पोस्ट केलेला एक ताजा फोटो तुम्ही बघायलाच हवा. यात यशवर्धन काहीतरी तरी वाचताना दिसतोय. यावरून यशवर्धन लवकरच बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेणार, असे मानले जात आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून यशवर्धनच्या बॉलिवूड डेब्यूची तयारी सुरू आहे. पापा गोविंदासोबत तो अनेकदा दिसला. सोशल मीडियावरही अलीकडच्या काळात तो प्रचंड अ‍ॅक्टिव्ह झाला आहे. हे सगळे बघता गोविंदाच्या लेकाने बॉलिवूडसाठी कंबर कसली, असे मानायला हरकत नाही.

मध्यंतरी यशवर्धन निर्माता साजिद नाडियाडवालाच्या बॅनरखाली फिल्ममेकिंगचे धडे गिरवत असल्याची बातमी आली होती. तो प्रॉडक्शन डिपार्टमेंटचे काम शिकतोय, असेही सांगितले गेले होते. यानंतर अचानक यशवर्धन अ‍ॅक्टिंगमध्ये हात आजमावणार असल्याचे वृत्त आले. वरूण धवन व रणबीर कपूर यासारख्या अभिनेत्यांनी अ‍ॅक्टिंगमध्ये येण्यापूर्वी फिल्म प्रॉडक्शनचे काम शिकले होते. आज वरूण व रणबीर बॉलिवूडचे आघाडीचे स्टार आहेत. गोविंदाचा लेक यशवर्धनही याच मार्गावरून चालताना दिसतोय. आता या मार्गात तो किती यशस्वी होतो, ते बघूच.

टॅग्स :गोविंदा