Join us

​गीता कपूर यांची अंत्यविधी करायला पोहोचली त्यांची मुलगी... पण सगळ्यांसमोर ठेवली ही अट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2018 12:15 IST

‘पाकिजा’ या चित्रपटात राजकुमार यांच्या दुसऱ्या पत्नीची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री गीता कपूर (वय ५७) यांनी शनिवारी या जगाचा ...

‘पाकिजा’ या चित्रपटात राजकुमार यांच्या दुसऱ्या पत्नीची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री गीता कपूर (वय ५७) यांनी शनिवारी या जगाचा निरोप घेतला. निर्माता अशोक पंडित यांनी गीता यांच्या पार्थिवाचा फोटो आणि व्हिडीओ शेअर करून त्यांच्या निधनाची माहिती दिली होती. गीता या गेल्या वर्षभरापासून आजारी होत्या. वर्षभरापूर्वी त्यांच्या मुलाने त्यांना एका रुग्णालयात बेवारस स्थितीत सोडले होते. तेव्हापासून त्यांच्या कुटुंबीयांकडून कोणीही त्यांची अखेरपर्यंत विचारपूस केली नाही. अशोक पंडित यांनीच त्यांच्या उपचाराची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. त्यांच्या अंत्यसंस्काराकडेही मुलांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले होते. पण काल अचानक त्यांची मुलगा अंधेरीतील अंबोली पोलिस स्टेशनमध्ये आली आणि तिने मृतदेह तिच्याकडे सोपवण्याची मागणी केली. तिच्या आईचे अंत्यसंस्कार करायला ती तयार असल्याचे देखील तिने सांगितले. पण तिच्या आईच्या अंतिम संस्काराला कोणीही हजेरी लावू नये असे देखील सगळ्यांना सांगितले. अशोक पंडित यांनीच ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, गीता कपूर यांची मुलगी त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आली. तिने आम्हाला सांगितले की, तिच्या आईचे अंतिम संस्कार ती खाजगीत करणार आहे. त्यामुळे त्यात आम्ही कोणीही हस्तक्षेप करू नये.... तिने तिच्या आईला या अवस्थेत सोडून का दिले होते हाच प्रश्न मला त्यावेळी पडला होता. याविषयी आम्ही तिला विचारले असता त्यांच्या मुलीने आम्हाला सांगितले की, गीता कपूर वृद्धाश्रमात आहेत याची तिला कल्पनाच नव्हती. यावर डॉ.त्रिपाठी आणि मी शांत बसणेच पसंत केले. कारण त्यांची मुलगी खोटी बोलत आहे हे आम्हाला दोघांनाही माहीत आहे. त्यांच्या मुलीचे नाव आराध्या कपूर असून ती एका प्रायव्हेट एअरलाइन्समध्ये एअर होस्टेस आहे. आम्ही तिला विनंती केली होती की, चित्रपटसृष्टीतील लोकांना अंतिमसंस्कार कधी आहे हे सांगावे. तसेच वृद्धाश्रमातील सिस्टर, त्यांचे डॉक्टर यांना देखील गीता कपूर यांच्या अंतिम संस्काराविषयी कळवावे. पण यास तिने नकार दिला. एक माणूस म्हणून आम्ही आमचे कर्तव्य पार पाडले. गीता कपूर यांच्या आत्म्यास शांती लाभो...Also Read : ‘पाकिजा’ अभिनेत्री गीता कपूरचे निधन; वृद्धाश्रमातच घेतला अखेरचा श्वास!