Join us  

गहना वशिष्ठ इंस्टाग्रामवर केलं न्यूड लाइव्ह सेशन, व्हिडीओ पाहून सगळेच हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2021 1:38 PM

गहना वशिष्ठने नुकतेच इंस्टाग्रामवर एक न्यूड लाइव्ह सेशन केले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राला पोर्नोग्राफी कंटेट प्रकरणात अटक केली आहे. राज कुंद्रा प्रकरणी सगळेजण आपले प्रतिक्रिया देत आहेत. या प्रकरणी सर्वात महत्वाची असलेली अभिनेत्री मॉडेल गहना वशिष्ठचा एक व्हिडीओ समोर आला आहे. गहनाने नुकतेच इंस्टाग्रामवर एक न्यूड लाइव्ह सेशन केले आहे. या लाईव्ह व्हिडीओत गहना न्यू़ड होती. हा व्हिडीओ वल्गर आहे का? असा सवालही तिने युझर्सला विचारला. हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. 

या व्हिडीओत गहना वशिष्ठ म्हणाली की, 'नमस्कार मित्रांनो. मी तुमच्या सर्वांसमोर न्यूड बसलीय. मी असभ्य दिसत असेल तर मला सांगा. मी पॉर्न स्टार दिसते का? किंवा मी पॉर्न आशय करते आहे असे वाटते आहे का?' गहना वशिष्ठचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

यात गहना सांगते की, माझा मुद्दा असा आहे की मी काहीही परिधान करत नाही पण तरीही तुम्ही ते पॉर्नच्या श्रेणीत धरत नाही. माझे बाकीचे व्हिडीओ ज्यात मी चांगले कपडे घातले आहेत, तरीही तुम्ही त्यांना अश्लील म्हणतात. ही चुकीची गोष्ट आहे. सर्वजण म्हणत आहे की पॉर्न शूट केले जाते, पॉर्न शूट केले जाते. आता मी एकही कपडे घातलेले नाही, पण तरीही तुम्ही म्हणताय की मी वल्गर नाही. '

गहना वशिष्ठचे खरे नाव वंदना तिवारी आहे. मॉडेलिंगमध्ये आल्यानंतर तिने आपले नाव बदलले आणि गहना वशिष्ठ केले. तिचे मित्र तिला जिंदगी नावानेही ओळखतात. कम्प्युटर सायन्समध्ये बीटेक केलेल्या गहनाला कॉलेजमध्ये असताना मॉडेलिंगच्या ऑफर मिळू लागल्या आणि ती मॉडेलिंगकडे वळली. तिने आतापर्यंत अनेक जाहिरातींमध्ये काम केलं आहे. एकता कपूरच्या ‘गंदी बात’ या वेबसीरिजमध्ये तिने काम केले आहे. ‘बहनें’ या मालिकेत ती लीड रोलमध्ये दिसली होती. ‘फिल्मी दुनिया’ या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. काही तेलगू सिनेमातही ती झळकली आहे.

टॅग्स :शिल्पा शेट्टीराज कुंद्रा