Join us  

गणेश आचार्यनं फेटाळले महिला कोरिओग्राफरचे आरोप, म्हणाला - या सगळ्यात सरोज खानचा हात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 5:57 PM

बॉलिवूडचा प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्यविरोधात एका 33 वर्षीय नृत्यदिग्दर्शिकेने अंबोली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

बॉलिवूडमधील अनेक सुपरस्टार्सना आपल्या तालावर नाचवणारा बॉलिवूडचा प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्यविरोधात एका ३३ वर्षीय नृत्यदिग्दर्शिकेने अंबोली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. गणेश आचार्य कमिशनची मागणी करत अश्लिल व्हिडीओ पाहण्यासाठी बळजबरी करत असल्याचा गंभीर आरोप या महिलेने केला आहे. यावर आता कोरिओग्राफर गणेश आचार्यनं प्रतिक्रिया दिली आहे.एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, इंडियन फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन कोरिओग्राफर्स असोसिएशनचे महासचिव असलेल्या गणेश आचार्यवर संबंधित महिलेने अनेक आरोप केले आहेत. या महिलेनं तिच्या तक्रारीत म्हटलं होतं की, गणेश आचार्य तिला या इंडस्ट्रीमध्ये काम मिळू देत नाही. तसेच कामाच्या बदल्यात तो कमिशन मागतो आणि यासोबतच जबरदस्तीनं अडल्ट व्हिडीओ पहायला लावतो.स्पॉटबॉयच्या रिपोर्टनुसार, या महिलेचं म्हणणं होतं की, गणेश आचार्य जेव्हापासून इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन कोरिओग्राफर असोसिएशनचा जनरल सेक्रेटरी झाला तेव्हापासून त्यानं तिला अधिकच त्रास द्यायला सुरुवात केली आहे.

या संपूर्ण प्रकरणावर टीव्ही 9 मराठीशी बोलताना गणेश आचार्यनं सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. या सर्व प्रकरणात सरोज खानचा हात असून माझ्याविरोधात असे आरोप करणाऱ्या लोकांना घाबरणाऱ्यातील मी नाही. मी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करेन. मी त्या महिलेला ओळखतही नाही आणि लोकांना माहित आहे की गणेश आचार्य व्यक्ती म्हणून कसा आहे किती लोकांचं करिअर मी मार्गी लावलं आहे. त्यामुळे अशा लोकांमुळे माझ्यावर काहीही फरक पडत नाही. मी माझं काम करत राहणार आहे. अशी प्रतिक्रिया गणेश आचार्यनं दिली आहे.काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ कोरिओग्राफर सरोज खान यांनीही गणेश आचार्यवर गंभीर आरोप केले होते. गणेश आपले वजन वापरून नव्या डान्सर्सला फसवत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

टॅग्स :गणेश आचार्यसरोज खान