Join us  

​‘सैराट’चा रिमेक वगैरे विसरा! मम्मी श्रीदेवीच्या ‘या’ चित्रपटाच्या सीक्वलमध्ये दिसणार जान्हवी कपूर !!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2017 9:13 AM

श्रीदेवीची लाडकी लेक जान्हवी कपूर हिच्या बॉलिवूड डेब्यूच्या बातम्या अनेक दिवसांपासून येत आहेत. चाहतेही जान्हवीला सिल्व्हर स्क्रिनवर पाहायला उत्सूक ...

श्रीदेवीची लाडकी लेक जान्हवी कपूर हिच्या बॉलिवूड डेब्यूच्या बातम्या अनेक दिवसांपासून येत आहेत. चाहतेही जान्हवीला सिल्व्हर स्क्रिनवर पाहायला उत्सूक आहेत. पण अद्याप जान्हवीचा डेब्यू रखडला आहे. आता मात्र जान्हवीच्या डेब्यूबद्दल एक वेगळीच खबर ऐकायला येतेय. होय, जान्हवी म्हणे मम्मी श्रीदेवीसोबत डेब्यू करणार आहे. तेही मम्मीच्याच एका गाजलेल्या चित्रपटाच्या सीक्वलमधून. चर्चा खरी मानाल तर, जान्हवी ‘मिस्टर इंडिया’च्या सीक्वलमध्ये दिसणार आहे. यात ती श्रीदेवीसोबत काम करताना दिसेल. या सीक्वलमध्ये दोन जोड्या असतील. पहिली जोडी कॉमन जोडी. अर्थातच श्रीदेवी आणि अनिल कपूर यांची. तर दुसºया जोडीत  यंग स्टार्स दिसतील. यात जान्हवी कपूर हिरोईनची भूमिका साकारताना दिसेल.ALSO READ: Iconic ladies: ​श्रीदेवीच्या बर्थ डे पार्टीतील काही ‘युनिक’ फोटो पाहा इथे!१९८७ मध्ये आलेला ‘मिस्टर इंडिया’ प्रचंड गाजला होता. याच्या सीक्वलची चर्चा बºयाच दिवसांपासून होती. प्रोड्यूसर बोनी कपूर (श्रीदेवीचा पती अन् जान्हवी कपूरचे डॅड) यांनीही या चित्रपटाचा सीक्वल बनवण्याची इच्छा बोलून दाखवली होती. अलीकडे श्रीदेवीनेही याबद्दल हिंट दिली होती.  सध्या ‘मिस्टर इंडिया’च्या सीक्वलवर बोलणे घाईचे ठरेल. सध्या केवळ सीक्वलवर चर्चा झालीय. काहीही फायनल झालेले नाही, असे श्रीदेवी म्हणाली होती. पण आता कदाचित फायनल झालेय. ‘मिस्टर इंडिया’चा सीक्वल रवी उद्धावर डायरेक्ट करणार, असे कळतेय. रवी उद्धावर याने  श्रीदेवी स्टारर ‘मॉम’मधून डायरेक्टर डेब्यू केला होता.मध्यंतरी जान्हवी ‘सैराट’ या गाजलेल्या मराठी चित्रपटाच्या रिमेकमधून बॉलिवूड डेब्यू करणार, अशी बातमी आली होती. खरे तर ही बातमी खरी असती तर या चित्रपटाची घोषणा आत्तापर्यंत व्हायला हवी होती. ही घोषणा न झाल्याने जान्हवी व श्रीदेवी दोघीही नाराज असल्याचे नुकतेच कानावर आले होते. कदाचित करणकडून कुठलाच प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून श्रीदेवीनेच मोर्चा सांभाळला असावा. जान्हवीला लॉन्च करण्याची जबाबदारी कदाचित तिने आपल्या शिरावर घेतली असावी. आता खरे काय, हे लवकरच कळेल. तोपर्यंत प्रतीक्षा करूयात.