First Teaser Out : ‘मातृ’मध्ये रविना टंडनचा पॉवरफुल अवतार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2017 18:45 IST
अभिनेत्री रविना टंडन हिच्या आगामी ‘मातृ’ या चित्रपटाचा फर्स्ट टिझर काही वेळापूर्वीच रिलीज करण्यात आला असून, त्यामध्ये रविना अतिशय पॉवरफुल महिलेच्या अवतारात दिसत आहे. हा टिझर ट्वीटर अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. टिझर
First Teaser Out : ‘मातृ’मध्ये रविना टंडनचा पॉवरफुल अवतार
अभिनेत्री रविना टंडन हिच्या आगामी ‘मातृ’ या चित्रपटाचा फर्स्ट टिझर काही वेळापूर्वीच रिलीज करण्यात आला असून, त्यामध्ये रविना अतिशय पॉवरफुल महिलेच्या अवतारात दिसत आहे. हा टिझर ट्वीटर अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. टिझर हा पूर्णत: सायलेंट असून, त्याच्यामध्ये गंभीर विषयांवर चर्चा होत असताना बघावयास मिळत आहे. टिझरच्या अखेरीस रविनाची एकच झलक आहे, मात्र त्यातही ती पॉवरफुल अवतारात दिसत आहे. गेल्या कित्येक वर्षांनंतर रविना ‘मातृ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री करीत आहे. या चित्रपटाची कथा पूर्णत: बलात्कार आणि घरगुती हिंसा या विषयावर आधारित आहे. चित्रपटात रविना एका नोकरदार महिलेची भूमिका साकारत आहे. जी तिच्या व्यक्तिगत आणि प्रोफेशनल आयुष्याशी झगडत असते. अंजूम रिजवी यांच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अश्तर सईद यांनी केले आहे. हा चित्रपट २१ एप्रिल रोजी रिलीज होणार असून, पूर्णत: महिला केंद्रित आहे. रविना या चित्रपटाच्या टिझरबाबत समाधानी आहे. मात्र तिने टीव्हीएफ प्लेटफॉर्मवर चित्रपटाचे प्रमोशन करण्यास सपशेल नकार दिला आहे. कारण टीव्हीएफच्या अरुणाभ कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप लावण्यात आलेला आहे.