‘रॉक आॅन 2’ चे पहिले गाणे उद्या होणार रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2016 12:45 IST
फरहान अख्तर आपल्या आगामी ‘रॉक आॅन 2’या चित्रपटामुळे खूप उत्साहीत आहे. अख्तरने या चित्रपटाच्या पहिल्या गाण्याविषयी माहिती शेअर केली. ...
‘रॉक आॅन 2’ चे पहिले गाणे उद्या होणार रिलीज
फरहान अख्तर आपल्या आगामी ‘रॉक आॅन 2’या चित्रपटामुळे खूप उत्साहीत आहे. अख्तरने या चित्रपटाच्या पहिल्या गाण्याविषयी माहिती शेअर केली. या गाण्याचे पोस्टर शेअर करण्याबरोबरच फरहानने माहितीही सांगितली. ‘जागोे’ हे या चित्रपटातील पहिल्या गाण्याचे नाव असून, ते १४ सप्टेंबरला रिलीज होणार आहे. ‘जागो’ टू डेज टू गो’ असे या पोस्टरमध्ये लिहीलेले आहे. या चित्रपटात फरहान अख्तर, अर्जुन रामपाल, पूरब कोहली, प्राची देसाई सोबत श्रद्धा कपूर व शशांक अरोडा हे दोन नवीन चेहरे सुद्धा दिसणार आहेत. हा चित्रपट ११ नोव्हेंबरला रिलीज होत आहे.