Join us  

इरफान खानच्या फॅन्ससाठी खुशखबर! इरफान परतला भारतात... पाहा त्याची पहिली झलक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2019 12:18 PM

इरफानचा हा फोटो व्हायरल भयानी या प्रसिद्ध फोटोग्राफरने त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. तसेच या फोटोतील व्यक्ती हा इरफानच आहे याची खात्री करून देण्यासाठी याच कपड्यांमधला इरफानचा एक जुना फोटो देखील इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

ठळक मुद्देफोटोग्राफर्सने त्याचे फोटो काढू नयेत यासाठी  इरफानने त्याचा चेहरा झाकला होता. यावेळी इरफानने पांढऱ्या रंगाचा शर्ट, कॅमोफ्लेग पँट आणि त्यावर गुलाबी रंगाचा कोट घातलेला होता. तसेच त्याने एक छानशी हॅट घातली होती. 

लंडनमध्ये न्युरोएंडोक्राईन कॅन्सर या आजारावर उपचार घेत असलेला अभिनेता इरफान खान याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इरफान नुकताच भारतात परतला आहे. त्याला आज सकाळी मुंबईच्या विमानतळावर पाहाण्यात आले. पण फोटोग्राफर्सने त्याचे फोटो काढू नयेत यासाठी  इरफानने त्याचा चेहरा झाकला होता. यावेळी इरफानने पांढऱ्या रंगाचा शर्ट, कॅमोफ्लेग पँट आणि त्यावर गुलाबी रंगाचा कोट घातलेला होता. तसेच त्याने एक छानशी हॅट घातली होती. 

इरफानचा हा फोटो व्हायरल भयानी या प्रसिद्ध फोटोग्राफरने त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. तसेच या फोटोतील व्यक्ती हा इरफानच आहे याची खात्री करून देण्यासाठी याच कपड्यांमधला इरफानचा एक जुना फोटो देखील इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या फोटोत आपल्याला त्याच्यासोबत शाहरुख खान दिसत आहे. 

मुंबईत परतल्यानंतर आता काहीच दिवसांत इरफान ‘हिंदी मीडियम २’च्या शूटींगला सुरुवात करणार आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात हे शूटींग सुरू होईल, असे कळतेय. ‘हिंदी मीडियम’चे मेकर्स इरफानला भेटायला लंडनमध्ये गेले होते. येथे त्यांनी इरफानला ‘हिंदी मीडियम २’ची स्क्रिप्ट ऐकवली होती. ही स्क्रिप्ट आवडल्यामुळे इरफानने त्यात काम करण्यास होकार दिला होता.‘हिंदी मीडियम’ हा देशाच्या शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करणारा चित्रपट होता. यातील इरफानच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले होते. पाकिस्तानी अभिनेत्री सबा कामर यात मुख्य भूमिकेत होती. भारत आणि चीन या दोन्ही देशात या चित्रपटाने बक्कळ कमाई केली होती.

इरफानच्या कॅन्सरचे निदान होण्यापूर्वीच म्हणजेच, फेब्रुवारी २०१८ मध्येच ‘हिंदी मीडियम’च्या सिक्वलची घोषणा झाली होती. होमी अदजानिया हा चित्रपट दिग्दर्शित करणार असेही जाहीर करण्यात आले होते. पण इरफानच्या प्रकृतीमुळे हा चित्रपट लांबणीवर टाकण्यात आला होता. त्यानंतर मेकर्सनी इरफारनकडे या चित्रपटाचा विषयही काढला नव्हता. पण इरफानच्या प्रकृतीत काहीशी सुधारणा होताच, मेकर्सनी त्याची भेट घेतली.  

इरफानच्या बॉलिवूडमधील कमबॅकची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. 

 

 

टॅग्स :इरफान खान