Join us  

जाणून घ्या किती होती सनी लिओनीची पहिली कमाई,वाचून तुम्हीही व्हाल थक्क!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 12:23 PM

बॉलिवूडमध्ये काम करताना तिने काही नियम तयार केले आहेत. तशात काही अटी की अॅडल्ट इंडस्ट्रीमध्ये काम करताना ठेवत होते. आपल्या अटींवर ती अॅडल्ट इंडस्ट्रीमध्ये काम करत होती.

सनी लिओनी सध्या 'करनजीत कौर: द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लियोनी' या आपल्या बायोपिकमुळे फारच चर्चेत आहे. सनी लिओनी म्हटलं की रसिकांच्या काळजाची धडकन. तिच्या मादक अदा, बोल्ड अंदाज आणि दिलखेचक डान्स यामुळं रसिक सारं काही विसरुन जातात. त्यामुळेच  'करनजीत कौर: द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लियोनी' सिनेमाची रसिकांना उत्सुकता आहे.सेलिब्रिटी मंडळींवर रसिक जीव ओवाळून टाकतात. रसिकांचं या सेलिब्रिटींवर मनापासून प्रेम असतं. रसिकांच्या या प्रेमामुळेच सेलिब्रिटी मंडळी त्यांच्या करिअरमध्ये कोट्यवधींची कमाई करतात. दर महिन्याला सेलिब्रिटी गलेलठ्ठ कमाई करतात. करिअरच्या सर्वोच्च शिखरावर असताना होणा-या कमाईचा आकडा पाहून अनेकांना धक्काही बसतो. 

आज सनी लिओनीची गणना बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये केली जाते. एका मुलाखतीत सनीने सांगितले होते, की  व्यावसायिक दृष्टीकोनातून तिने पोर्न इंडस्ट्रीत पदार्पण केले होते. "आईवडिलांच्या मनाविरुद्ध जाऊन मी पोर्न इंडस्ट्रीत पदार्पण केले होते. जेव्हा मी पेंटहाउस (अॅडल्ट इंडस्ट्रीतील प्रसिद्ध मॅगझिन) कवर ऑफ द इअर आणि $100,000 आजच्या काळानुसार 68 लाख रुपये जिंकले होते, आणि पोर्न इंडस्ट्रीच्या पदार्पणातच माझी ही पहिली कमाई होती. तेव्हा पहिल्यांदा मी माझ्या आईवडिलांना या क्षेत्राविषयी सांगितले होते. 

सनी लिओनी पॉर्न इंडस्ट्री सोडली असून आता ती बॉलिवूडमध्ये काम करत असली तरीही. बॉलिवूडमध्ये काम करताना तिने काही नियम तयार केले आहेत. तशात काही अटी की अॅडल्ट इंडस्ट्रीमध्ये काम करताना ठेवत होते. आपल्या अटींवर ती अॅडल्ट इंडस्ट्रीमध्ये काम करत होती. ऑन एंड ऑफ स्क्रीन बोल्ड लूकमुळे चर्चेत असणारी सनी प्रत्यक्ष जीवनातही बिनधास्त आणि रोखठोक आहे.. हॉट अदा आणि आयटम नंबर करणा-या सनीला आता काही तरी वेगळं करायचंय... असं असलं तरी पर्सनल लाईफमध्ये ही पॉर्न स्टार सध्या खूष आहे... एकूणच काय ही सध्या बॉलीवुड आणि फॅन्समध्ये फक्त सनी लिओनीची हवा आहे.

टॅग्स :सनी लिओनी