Join us

‘पद्मावती’च्या शूटिंगचा पहिला दिवस अविस्मरणीय - भन्साळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2016 18:29 IST

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा आगामी चित्रपट ‘पद्मावती’ सध्या शाहिद कपूर, रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांच्यामुळे चर्चेत आहे. ...

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा आगामी चित्रपट ‘पद्मावती’ सध्या शाहिद कपूर, रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांच्यामुळे चर्चेत आहे. ‘पद्मावती’ हा चित्रपट म्हणजे भन्साळींचं स्वप्न. चित्रपटाची शूटिंग केव्हा सुरू होणार याकडे त्यांचे लक्ष लागले होते. पण, जेव्हा दीपिका पादुकोण ही आर. पद्मिनीच्या लूकमध्ये सेटवर पोहोचली. तेव्हा तिला पाहून त्याला पहिल्यांदा वाटलं की, खरंच ‘पद्मावती’ ची शूटिंग सुरू झालीय ते. ‘पद्मावती’चे कथानक अल्लाऊद्दीन खिल्जीचे चित्तोडची राणी पद्मिनीवर असलेले प्रेम यावर आधारित आहे. राणी पद्मिनी ही सौंदर्य, बुद्धीमत्ता आणि धैर्य यांच्यासाठी ओळखली जायची. रणवीर सिंग हा अल्लाऊद्दीन खिल्जी यांची भूमिका साकारणार असून, रणवीरसोबत भन्साळींची ही ‘हॅटट्रिक‘ आहे. पद्मिनीचा पती चित्तोडचा राजा रतनसेनची भूमिका शाहिद कपूरने केली आहे. सूत्रांनुसार, दीपिका चित्रपटाची शूटिंग खूप एन्जॉय करते आहे. हा भन्साळींसोबतचा तिचा तिसरा चित्रपट आहे.