Join us

...अखेर शिरीष कुंदरने योगी आदित्यनाथची मागितली माफी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2017 14:50 IST

उत्तर प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर केलेले टीकात्मक ट्विट दिग्दर्शक शिरीष कुंदर यांना चांगलेच भोवल्याचे दिसून येत आहे. ...

उत्तर प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर केलेले टीकात्मक ट्विट दिग्दर्शक शिरीष कुंदर यांना चांगलेच भोवल्याचे दिसून येत आहे. या ट्विट प्रकरणानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने आता शिरीषने स्पेशल माघार घेत जाहीरपणे योगी आदित्यनाथ यांची माफी मागितली आहे. शिरीषने पुन्हा एक ट्विट करून त्यामध्ये, ‘मी केलेल्या ट्विटवरून आपली माफी मागत असल्याचे म्हटले आहे. }}}} ">http://शिरीषने ट्विटमध्ये योगी आदित्यनाथ यांना ‘गून’ म्हणजेच ‘गुंड’ असे संबोधले होते. त्यानंतर योगी आदित्यनाथ यांच्या कार्यकर्त्यांनी शिरीष कुंदर यांना टार्गेट केले होते. कुंदर यांनी आमच्या भावना दुखावल्याचे कारण देत त्यांच्यावर गुन्हाही दाखल केला होता. एका रिपोर्टनुसार शिरीष यांच्यावर हजरतगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिरीष यांच्याविरोधात वाढता असंतोष लक्षात घेता त्यांनी माघार घेत योगी आदित्यनाथ यांची सपशेल माफी मागितली आहे. तसेच कोणाच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेश, गोरखपूरमधून खासदार असून, नुकतीच त्यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. जेव्हा योगी हे मुख्यमंत्री झाल्याचे स्पष्ट झाले, तेव्हा शिरीषने ट्विट करून जाहीरपणे योगी यांना विरोध दर्शविला होता. योगी त्या पदाच्या लायक नसल्याचे शिरीषने म्हटले होते. त्यानंतर योगी आदित्यनाथ यांच्या कार्यकर्त्यांनी शिरीषचा कडाडून विरोध केला होता. शिरीष कुंदर बॉलिवूडची प्रसिद्ध कोरियोग्राफर तथा दिग्दर्शक फराह खान हिचा पती आहे. या प्रकरणात फराह हिनेही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता.