Join us  

आमिर खानच्या चित्रपटांची ‘अधुरी कहानी’! चाहत्यांनाही बसेल धक्का!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 2:37 PM

आज आम्ही आमिरच्या हिट, फ्लॉप चित्रपटांबद्दल नाही तर त्याच्या कधीही प्रदर्शित न झालेल्या चित्रपटांबद्दल तुम्हाला सांगणार आहोत.

ठळक मुद्देआमिरचे हे चित्रपट वेगवेगळ्या कारणाने थंडबस्त्यात गेले.

बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानचे चित्रपट येतात आणि इतिहास रचतात. अर्थात त्याच्या गतवर्षी रिलीज झालेल्या ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ने प्रेक्षकांची निराशा केली. आमिरचा हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर फार कमाल दाखवू शकला नाही. आज आम्ही आमिरच्या हिट, फ्लॉप चित्रपटांबद्दल नाही तर त्याच्या कधीही प्रदर्शित न झालेल्या चित्रपटांबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. आमिरचे हे चित्रपट वेगवेगळ्या कारणाने थंडबस्त्यात गेले.

लज्जोआमिर खानच्या या चित्रपटात करिना कपूर झळकणार होती. या चित्रपटाची कथा ऊर्दू लेखिका इश्मत चुगतई यांच्या आयुष्यावर बेतलेली होती. निर्माता बॉबी बेदीने या चित्रपटाची घोषणा केली होती. स्टारकास्टचीही घोषणा झाली होती. पण चित्रपटाच्या स्क्रिप्टच्या हक्कावरून हा चित्रपट वादात सापडला आणि पुढे बंद पडला.

रिश्ताआमिरच्या ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ या चित्रपटात आमिर व अमिताभ यांची जोडी प्रथमच एकत्र दिसली. पण खरे तर या जोडीला एकत्र पाहण्याची संधी फार वर्षांपूर्वीच प्रेक्षकांना मिळणार होती. ‘रिश्ता’ या चित्रपटासाठी ही जोडी फायनल झाली होती. पण कुठल्याशा कारणाने हा चित्रपट रखडला आणि ही जोडी बनता बनता राहिली.

  नानावटी प्रकरणावर आधारित चित्रपटमीडियाचे मानाल तर आमिर खान एकेकाळी प्रचंड गाजलेल्या नानावटी प्रकरणावर चित्रपट बनवू इच्छित होता. पण त्याआधीच अक्षयने बाजी मारली. अक्षय कुमारचा ‘रूस्तम’ हा चित्रपट याच हत्याकांडावर आधारित होता. त्यामुळे आमिरने आपला प्रोजेक्ट बंद केला.

महाभारतआमिर खान दीर्घकाळापासून ‘महाभारत’ या महाकाव्यावर चित्रपट बनवण्याच्या विचारात आहे. या चित्रपटाचा बजेट १००० कोटीच्या घरात होता. काही महिन्यांपूर्वी हा चित्रपट येणार, असे मानले गेले होते. पण नंतर हा चित्रपट बंद झाल्याचेही वृत्त आले.

टाईम मशीनआमिरचा मध्येच बंद पडलेला आणखी एक चित्रपट म्हणजे, टाईम मशीन. शेखर कपूर दिग्दर्शित या चित्रपटाच्या अनेक भागांचे शूटींगही झाले होते. १९९२ मध्ये तो रिलीज होणार होता. पण अचानक हा चित्रपटही थंडबस्त्यात गेला.

टॅग्स :आमिर खान