दरम्यान, ‘ऋचा चढ्ढाच्या समर्थनार्थ सर्वात अगोदर अभिनेत्री पूजा भट्ट हिने आपली भूमिका मांडली होती. तिने ट्विट करून लिहिले होते की, ‘तुला याची तक्रार करायला हवी. ट्विटरनेदेखील याबाबतची जबाबदारी स्वीकारायला हवी. कारण जे लोक जिवे मारण्याची आणि एका महिलेवर बलात्कार करण्याची धमकी देतात अशा लोकांना ट्विटर खुले व्यासपीठ कसे देऊ शकते? केवळ पूजाच नव्हे तर स्वरा भास्कर, पुलकित सम्राट यांनीदेखील ऋचाचे समर्थन केले होते. दरम्यान, ऋचाला मिळत असलेल्या धमक्यांनंतर तिने धमकीच्या ट्विटचे स्क्रिन शॉट काढून त्याबाबतची ट्विटरकडे तक्रार केली होती. काही स्क्रिनशॉट शेअर करताना ऋचाने ट्विट केले होते की, ‘हे ट्विट, मला टार्गेट केले जात असल्याने किंवा माझ्याबद्दल केल्या जात असलेल्या अपशब्दाबद्दल माझी काहीच तक्रार नाही. देशात इतकी बेरोजगारी आहे की, दहा रुपयांसाठीदेखील कोणीही ट्विट करण्याचे धाडस करते. त्यासाठी मी त्यांना जज करीत नाही. परंतु बलात्कार आणि जिवे मारण्याची धमकी देणे हे गंभीर आहे. कम आॅन ट्विटर इंडिया’}}}} ">Top management at Twitter must regroup and decide what they’d like their service to be remembered for.If it’s for good, then they need to get smarter in its regulation. Rape and death threats cannot be allowed or go unpunished. @twitter@TwitterIndia— Farhan Akhtar (@FarOutAkhtar) May 10, 2018
ऋचाने आणखी एक ट्विट करताना लिहिले की, ‘प्रिय बेरोजगार, दहा रुपयांसाठी तुम्ही लोकांना ट्रोल करीत असता. पण माझ्याबद्दल असे करण्याचा विचारही करू नका. मी शिवीगाळ करण्याचा ठेका घेतला नाही.’}}}} ">You must report this. Twitter needs to take responsibility for this. They cannot provide a platform to people who openly threaten to rape and maim women.}}}} ">— Pooja Bhatt (@PoojaB1972) May 9, 2018