Join us  

प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री आहे आयरा खानची नणंद, लग्नात सासूबाईंनी करुन दिली नुपूरच्या बहिणीची ओळख

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 12:59 PM

Ira Khan And Nupur Shikhare : आमिर खान आणि रिना दत्ता यांची लेक आयरा खान आणि सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरे यांचा विवाह सोहळा नुकताच थाटामाटात पार पडला.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan)आणि रिना दत्ता (Reena Dutta) यांची लेक आयरा खान (Ira Khan) आणि सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरे (Nupur Shikhare) यांचा विवाह सोहळा नुकताच थाटामाटात पार पडला. त्या दोघांनी सुरुवातीला कोर्ट मॅरेज केले. त्यानंतर उदयपूर येथे मोजक्या लोकांच्या उपस्थितीत त्यांनी ख्रिश्चन पद्धतीने विवाह केला. आणि त्यानंतर लग्नाचं एक जंगी रिसेप्शन पार पडलं. या रिसेप्शन सोहळ्याला तर इंडस्ट्रीतले अनेक कलाकार उपस्थित होते. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. त्यातला एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. ज्यात नुपूरची आई त्याच्या बहिणीची ओळख करुन देत आहे. त्याची ही बहिण मराठमोळी अभिनेत्री आहे.

नुपूर शिखरेची ही मराठमोळी अभिनेत्री कोण आहे, हे जाणून घेण्यासाठी उत्सुक असाल ना. तर ही अभिनेत्री म्हणजे मिथिला पालकर. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत पाहायला मिळतंय की, ढोलच्या तालावर सगळे थिरकत असताना नुपूरची आई  प्रीतम शिखरेंनी मिथिला पालकरला बहीण अशी ओळख करुन दिली. 

अनेक वर्षांपासून नुपूर शिखरे मिथिला पालकरचा जिम ट्रेनर असून तो तिला बहीण मानतो. त्यांच्या दोघांचे जिममध्ये वर्कआऊट करतानाचे अनेक फोटो पाहायला मिळत असतात. नुपूर शिखरे मिथिलाला बहीण मानत असल्यामुळे नात्याने ती आयरा खानची नणंद लागते. 

आयराने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये तिची बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत एंगेजमेंट केली होती. दीर्घकाळ डेटिंग केल्यानंतर, या जोडप्याने फेब्रुवारी २०२१ मध्ये इंस्टाग्रामवर त्यांचे नाते अधिकृत केले. लॉकडाऊनदरम्यान आयरा ही तिच्या वडिलांबरोबर त्यांच्या घरी राहत होती. त्यावेळीच तिची आणि नुपूर शिखरेशी भेट झाली. नुपूर शिखरे आयराचे वडील आणि अभिनेता आमिर खानचा फिटनेस ट्रेनर म्हणून काम करायचा. त्यावेळी आयरा आणि नुपूर यांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले. यानंतर आयराने नुपूरची ओळख आई रीना दत्ताशी करुन दिली आणि तिनेही त्यांच्या नात्याला संमती दिली.

टॅग्स :इरा खानमिथिला पालकरआमिर खान