Join us  

खळबळजनक! दिशा सालियनवर बलात्कार झाल्याचा प्रत्यक्षदर्शीचा दावा, सुशांतला जाणून घ्यायचं होतं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 6:46 PM

सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियन मृत्यू प्रकरणात दररोज नवीन खुलासे समोर येत आहेत. दरम्यान आता दिशा सालियनवर बलात्कार झाल्याचा दावा प्रत्यक्षदर्शीने केला आहे.

सुशांत सिंग राजपूत आणि त्याची आधीची मॅनेजर दिशा सालियन यांच्या निधनामध्ये पाच दिवसांचे अंतर आहे. या दोघांच्या मृत्यूमागे काहीतरी कनेक्शन असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. जे लोक दिशाला ओळखतात त्यांना विश्वास बसत नाही आहे की अशाप्रकारे दिशा तिचे जीवन संपवेल. असेच काहीसे सुशांतच्याबाबतीतही लोकांचे म्हणणे आहे. काही डॉक्टरांनी सुशांतला मानसिक आजार असल्याचे म्हटले होते. अद्याप या दोघांच्या निधनाचे कारण समोर आलेले नाही.

दरम्यान, एबीपी न्यूजच्या रिपोर्टनुसार, एका प्रत्यक्षदर्शीने दावा केला आहे की दिशा सालियनवर ८ जून, २०२० ला मालाडमधील फ्लॅटमध्ये बलात्कार झाला आहे. या प्रत्यक्षदर्शीने एका न्यूज वाहिनीला सांगितले की, तोदेखील एक्टर आहे आणि तो मालाडमधील फ्लॅटवर रात्री ९ ते ९.३० दरम्यान गेला होता. तिथे एक तास पार्टी खूप चांगल्यारित्या चालू होती. त्यानंतर काही गोष्टी घडल्या त्या संशयास्पद होत्या. त्याने सांगितले की, पार्टीदरम्यान काही लोक बेडरूममध्ये गेले आणि दरवाजा आतून बंद केला. 

प्रत्यक्षदर्शी पुढे म्हणाला की, आवाज ऐकू येऊ नये म्हणून पार्टीदरम्यान म्युझिकचा आवाज जास्त ठेवला होता. ते मास्टर बेडरुममध्ये बंद होते आणि दिशा व तिचा फियॉन्से रोहन राय दुसऱ्या रुममध्ये होते. थोड्या वेळानंतर सर्वांना खोलीतून बाहेर काढले. त्यानंतर बाहेर जे झाले ते पाहून सगळे हैराण झाल्याचे त्या प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

प्रत्यक्षदर्शीने पुढे सांगितले की, दिशाला मृतावस्थेत पाहून रोहन राय आणि त्याचा मित्र वांद्रे रेल्वे स्टेशनच्या दिशेने पळाले आणि त्यांच्या घराकडे जाणारी पहिली ट्रेन पकडून निघून गेले.

तो म्हणाला की पोलिसांना पाहिजे तर रेल्वे स्टेशनचे सीसीटीव्ही तपासू शकतात. तो पुढे म्हणाला की, दिशाच्या मृत्यूबाबत जी थेअरी सांगितली जात होती, सुशांत सिंग राजपूत यांनाही त्याच्या मॅनेजरसोबत काय झाले होते, हे जाणून घ्यायचे होते. त्यामुळे त्यांना खूप दुःख झाले होते. त्यांनी आपल्या मित्रांना फोन करून हत्येचा संशय व्यक्त केला होता.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत