EXCLUSIVE : कोणती भूमिका सोनारिकाला वाटते आव्हानात्मक ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2016 15:46 IST
देवों के देव...महादेव या मालिकेत पार्वतीची भूमिका साकारणारी सोनारिका भदौरिया हिने प्रेक्षकांच्या मनात आपली एका वेगळी जागा निर्माण केली ...
EXCLUSIVE : कोणती भूमिका सोनारिकाला वाटते आव्हानात्मक ?
देवों के देव...महादेव या मालिकेत पार्वतीची भूमिका साकारणारी सोनारिका भदौरिया हिने प्रेक्षकांच्या मनात आपली एका वेगळी जागा निर्माण केली आहे. देवों के देव...महादेव या मालिकेत सोनारिकाने केलेली पार्वतीची भूमिका प्रेक्षकांच्या मनात आजही कायम आहे. आता सोनारिका पौराणिक मालिकेनंतर हॉरर चित्रपटाकडे वळाली आहे. अशा या दोन विरूद्ध भूमिका साकारताना तिला नेमके काय वाटले याविषयी लोकमत सीएनएक्सशी तिने साधलेला संवाद1. पौराणिक मालिकांनंतर तू थेट हॉरर चित्रपट करत आहे याविषयी काय सांगशील ? एक कलाकार म्हणून मला सातत्याने काहीतरी नवीन करायला आवडत. वेगळया भूमिका, भाषा सर्वकाही नवनवीन शिकायला मिळते. त्यामुळे पौराणिक मालिका आणि हॉरर चित्रपट अशा एकदमच विरूद्ध भूमिका करण्याचा अनुभव मिळाल्याने मी खूप आनंदी आहे. मी या दोन्ही भूमिका खूप एन्जॉय केल्या. 2. सध्या प्रेक्षक कॉमेडी चित्रपटांना पसंती देत असल्याचे चित्र आहे असे असताना तू साँसेसारख्या हॉरर चित्रपटाची निवड कशी केलीस ?प्रत्येकाची आपआपली आवड असते. सध्या रोमान्स, कॉमेडी, हॉरर, वैज्ञानिक असे अनेक चित्रपट येतात. प्रत्येक चित्रपटांना पाहणारा प्रेक्षकवर्ग हा वेगळा आहे. प्रत्येक चित्रपटाचा जोनरसुद्धा वेगळा असतो. मला स्वत:लादेखील रोमाँटिक चित्रपट पाहायला आवडतात.3. मालिका आणि चित्रपट यामध्ये काम करताना तुला जाणवलेला फरक काय होता ?सध्या छोटा पडदादेखील मोठा होत चालला आहे. चित्रपटाप्रमाणेच मालिकांचेदेखील प्रमोशन आता होतय. टेलिव्हिजनवरील मालिका मोठया बजेटमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. मालिकांमध्ये कित्येक वर्षे एकाच भूमिकेमध्ये राहावे लागते. तसेच त्याच टीमसोबत वर्षेनुवर्षे काम करावे लागते. मात्र चित्रपटाचं म्हणाल तर, नेहमी वेगवेगळया भूमिका करण्यास मिळत असतात. 4. तू दाक्षिणात्य चित्रपटदेखील केले आहेस, भविष्यात तू आम्हाला मराठी चित्रपटात दिसू शकतेस का ?मराठी चित्रपटांची मला दोन ते तीन वेळा ऑफर आली होती. पण त्यावेळी मी तामिळ चित्रपटांमध्ये व्यग्र होते. तसेच चित्रपटांच्या काही बिझी शेडयुल्डमुळे मला मराठी चित्रपट करता आले नाही .पण खरे सांगू का, मराठी चित्रपट मला फार आवडतात. या चित्रपटांमध्ये काम करण्याची माझीदेखील खूप इच्छा आहे. 5. मराठी चित्रपटांविषयी तुझे मत काय आहे ?- मराठी चित्रपट पाहण्याची मला कधी संधी मिळाली नाही. पण सध्या मराठी चित्रपटांची चर्चा सातत्याने ऐकण्यास मिळत आहे. त्यामुळे यंदा नक्की मराठी चित्रपट मी पाहीन. पण अजून एक सांगावेस वाटते की, मराठी संस्कृती मला फार आवडते. माझे खूप मित्र-मंडळीदेखील मराठी आहेत. 6. आतापर्यंत तुझ्यासाठी सर्वांत जास्त आव्हानात्मक भूमिका कोणती होती?माझ्यासाठी देवों के देव...महादेव या मालिकेतील पार्वतीची भूमिका ही सर्वात जास्त आव्हानात्मक होती. कारण या मालिकेत मी १५ ते १८ तास वजनदार कपडे, दागिन्यांमध्ये वावरत होते. ज्यावेळी या मालिकेत पार्वतीचे लग्न होते. त्यावेळी माझा १५ किलोचा लेहेंगा होता तर आोढणी १० किलोची होती. मला डोकं ही हलवता येत नव्हते. त्यामुळे माझ्यासाठी ही भूमिका करणे सगळ्यात जास्त अवघड होती.7. रियल लाइफमधील सोनारिका कशी आहे?मी आजच्या पिढीची स्वातंत्र विचारांची मुलगी आहे. मला पुस्तके वाचायला फार आवडतात. माझ्या हातात एखादे पुस्तक हाती लागले. तर मी ते पुस्तक पूर्ण वाचल्याशिवाय सोडत नाही. कित्येक वेळी मी पुस्तक वाचण्यासाठी रूमच्या बाहेरदेखील पडले नाही. त्याचबरोबर मला रोमाँटिक चित्रपटदेखील पाहायला फार आवडतात.- बेनझीर जमादार