Exclusive : परिणीती म्हणतेय, मी दबंग 3मध्ये नाहीये
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2016 13:16 IST
सलमान खानच्या दबंग, दबंग 2 या चित्रपटांच्या यशानंतर दबंग 3 हा चित्रपट लवकरच येणार आहे. या चित्रपटाच्या कथेवर सध्या ...
Exclusive : परिणीती म्हणतेय, मी दबंग 3मध्ये नाहीये
सलमान खानच्या दबंग, दबंग 2 या चित्रपटांच्या यशानंतर दबंग 3 हा चित्रपट लवकरच येणार आहे. या चित्रपटाच्या कथेवर सध्या काम सुरू आहे. दबंगच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागात सोनाक्षी सिन्हा सलमानसोबत झळकली होती. त्या दोघांची केमिस्ट्रीही प्रेक्षकांना आवडली होती. पण दबंग 3मध्ये सोनाक्षीला डिच्चू मिळणार असल्याचे म्हटले जात आहे. सोनाक्षीची जागा परिणीती चोप्रा घेणार असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. पण मी दबंग 3 या चित्रपटाचा भाग नसल्याचे परिणीतीने सीएनएक्ससोबत बोलताना स्पष्ट केले आहे. सीएनएक्सला दिलेल्या एक्सक्ल्युझिव्ह मुलाखतीमध्ये दबंग या चित्रपटाबाबत माझे कोणाशीच बोलणे झालेले नाही. या अफवा कोण पसरवत आहेत हे मला कळत नाहीये. मी सध्या माझ्या अनेक प्रोजेक्टमध्ये व्यग्र असल्याने नवा कोणताही चित्रपट करण्यास माझ्याकडे वेळच नाहीये असे ती सांगते.