Join us  

Exclusive! जेनेलियाच्या कमबॅकवर नवरा रितेश देशमुखने दिले हे उत्तर

By तेजल गावडे | Published: February 28, 2020 1:05 PM

लोकमतशी बोलताना रितेश देशमुखने जेनेलियाच्या कमबॅकबद्दल सांगितलं.

बॉलिवूडमधील क्युट कपल म्हणून अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा या जोडीकडे पाहिलं जातं. 'तुझे मेरी कसम' या सिनेमातून दोघांनी बॉलिवूडमध्ये पहिलं पाऊल ठेवलं आणि याच सिनेमातून दोघं आयुष्यभराचे जोडीदार बनले. रितेश व जेनिलिया यांच्या लग्नाला नुकतीच ८ वर्षे पूर्ण झाली आहेत. हे दोघे नेहमी सोशल मीडियावर एकत्र फोटो व मजेशीर व्हिडिओ शेअर करत असतात. रितेश बॉलिवूडमध्ये काम करताना दिसतो आहे. मात्र लग्नानंतर जेनेलिया सिनेइंडस्ट्रीपासून दुरावल्याचं पहायला मिळतं आहे. मात्र नुकतेच लोकमतशी बोलताना रितेश देशमुखने जेनेलियाच्या कमबॅकबद्दल सांगितलं.

लग्नानंतर जेनेलिया सिनेइंडस्ट्रीपासून लांब आहे. सध्या ती तिच्या फॅमिलीला वेळ देताना दिसते आहे. मात्र आजही तिचा चाहता वर्ग तिच्या कमबॅकची वाट पाहत आहे. जेनेलिया सिनेइंडस्ट्रीत अॅक्टिव्ह नसली तरी ती सोशल मीडियावर सक्रीय असते. तिथे ती तिचे ग्लॅमरस फोटो व व्हिडिओ शेअर करत असते. त्यामुळे ती कधी अभिनयात कमबॅक करणार याची प्रतीक्षा तिचे चाहते करत आहेत.

जेनेलियाच्या कमबॅकबद्दल रितेशला विचारले असता त्याने याबद्दल सांगितले. तो म्हणाला की, तिने पुन्हा सिनेइंडस्ट्रीत काम केले पाहिजे, अशी माझी अपेक्षा आहे. मग तिने बॉलिवूड, मराठी किंवा इतर भाषेतील सिनेमात काम करावे. लवकरच ती काम करताना दिसेल.

चित्रपट निवडताना जेनेलियाचा सल्ला घेतोस का, असे रितेशला विचारल्यावर त्याने सांगितले की, एखादा प्रोजेक्ट किंवा कोणतेही काम करताना मी जेनेलियाचा सल्ला घेतो. तसेच तिच्यासोबत चर्चा व विचारविमर्श करत असतो. चर्चा करताना एकमेकांची मतं समजतात. ते सल्ले नसतात. ते मांडलेले विचार असतात. त्यातील जे पटतं ते घ्यायचे जे पटत नाही ते आपल्याला वाटतं ते करायचं.

रितेश देशमुखच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तो लवकरच बागी ३ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत टायगर श्रॉफ, श्रद्धा कपूर व अंकिता लोखंडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

आता जेनेलिया कमबॅक कधी करते, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

टॅग्स :रितेश देशमुखजेनेलिया डिसूजाबागी ३टायगर श्रॉफश्रद्धा कपूरअंकिता लोखंडे