Join us

अखेर नागराज मंजुळेच्या ‘झुंड’साठी अमिताभ बच्चन यांनी दिला होकार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2018 17:46 IST

‘सैराट’ या मराठी चित्रपटानंतर नागराज मंजुळे हे नाव माहित नसणारा, एकही व्यक्ती नसेल. होय, ‘सैराट’ने दिग्दर्शक नागराज मंजुळे या ...

‘सैराट’ या मराठी चित्रपटानंतर नागराज मंजुळे हे नाव माहित नसणारा, एकही व्यक्ती नसेल. होय, ‘सैराट’ने दिग्दर्शक नागराज मंजुळे या नावाला एक वलय प्राप्त करून दिले. हेच नागराज मंजुळे आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत आणि त्यांच्या ‘झुंड’ नामक या चित्रपटात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे नाव अखेर फायनल झाले आहे. आम्ही ‘फायनल’ म्हणतोयं, कारण काही दिवसांपूर्वी अमिताभ यांनी  नागराज यांच्या या चित्रपटातून माघार घेतली होती. सूत्रांचे मानाल तर अमिताभ यांनी ‘झुंड’साठी घेतलेले सायनिंग अमाऊंटही परत केले होते. सिनेमाच्या तारखा पुढे ढकलल्या जात असल्याने नाराज होऊन त्यांनी हे पाऊल उचलले होते. प्रारंभी या चित्रपटासाठी पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात भव्य सेट लावण्यात आला होता. मात्र त्याला काही संघटनांनी विरोध केल्यामुळे तो काढावा लागला होता. यामुळे चित्रपटाचे अख्खे वेळापत्रक विस्कटले होते आणि याचा परिणाम म्हणजे, अमिताभ बच्चन यांचे वेळापत्रकही वेळापत्रक बिघडले होते.  यामुळे वैतागून अमिताभ यांनी या चित्रपटातून माघार घेतली होती. पण आता कदाचित सगळे काही ठीक झाले आहे. होय, निर्मात्यांच्या मनधरणीनंतर अखेर अमिताभ यांची या चित्रपटात पुन्हा वापसी झाली आहे.  ‘झुंड’ हा चित्रपट भूषण कुमार, कृष्ण कुमार, सविता राज, राज हिरेमथ आणि नागराज मंजुळे असे सगळे मिळून प्रोड्यूस करताहेत. हा नागराज यांचा बॉलिवूडचा पहिला हिंदी सिनेमा असणार आहे आणि या पहिल्या चित्रपटात महानायक अमिताभ दिसणार आहेत. साहजिकचं त्यांच्यासाठीचं नव्हे तर तमाम मराठीजनांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. नागराज यांचा हा चित्रपट फुटबॉल कोच विजय बरसे यांच्या जीवनावर आधारित आहे.ALSO READ : झुंड या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण होण्यापूर्वीच नागराज मंजुळे यांना बसला हा धक्का नागराज यांच्या ‘सैराट’  या चित्रपटाची चर्चा केवळ मराठी इंडस्ट्रीतच नव्हे तर बॉलिवूडमध्ये देखील झाली होती. या चित्रपटातील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना भावल्या होत्या. या चित्रपटातील सगळ्याच कलाकारांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. नागराज यांचा ‘सैराट’च्या आधी प्रदर्शित झालेला  ‘फँड्री’ देखील लोकांना खूप आवडला होता.