Join us  

प्रयत्न चांगला आहे, पण...; टीव्ही अभिनेत्रीने वाचला 'ब्रह्मास्त्र'मधील चुकांचा पाढा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 12:48 PM

रणबीर कपूर आणि आलिया भटचा ब्रह्मास्त्रला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. तर दुसरीकडे टीव्ही अभिनेत्रीनं या सिनेमांच्या चुकांचा पाढा वाचला आहे.

बॉलिवूड कपल रणबीर कपूर आणि आलिया भटचा ब्रह्मास्त्रला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. या सिनेमान रिलीजपासून कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला असला तर चाहत्यांना चित्रपट आवडला आहे. याचे पुरावे चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन देतंय. 

एरिकाला नाही आवडला ब्रह्मास्त्रपण तरीही काही लोकांना या चित्रपटानं निराश केलं आहे. यात टीव्ही अभिनेत्री एरिका फर्नांडिसचं नाव ही सामील आहे. एरिका फर्नांडिसने इंस्टा स्टोरीवर चाहत्यांच्या प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले की, तिला ब्रह्मास्त्र चित्रपट का आवडला नाही.युजरने एरिकाला विचारले - तू ब्रह्मास्त्र पाहिलास का? यावर एरिकाने होय असे उत्तर दिले.

सांगितल्या चूका तिनं लिहिलं- होय, मी चित्रपट पाहिला. हा एक चांगला प्रयत्न होता पण तो यशस्वी झाला नाही. चित्रपटाचं VFX जबरदस्त आहे. पण मला असे वाटते की अशा प्रकारच्या चित्रपट निर्मितीसाठी कलाकारांना अधिक ट्रेनिंग दिलं गेलं पाहिजे होतं आणि या चित्रपट दिग्दर्शनं अशा एका दिग्दर्शकानं केलंय ज्याचा हातखंडा रोमाँटिक चित्रपट बनवण्यात आहे. तरीही बॉलिवूडला मोठं आणि चांगले बनवण्याच्या दिशेने हे एक छोटेसे पाऊल आहे. प्रत्येकजण त्याच्या चुकीतून शिकतो. मला आशा आहे की त्यातून काहीतरी चांगले होईल. असं माझं स्पष्ट मत आहे.

ब्रह्मास्त्रच्या बॉक्स ऑफिसबद्दल बोलायचे झाले तर, या चित्रपटाने भारतात 6 दिवसांत जवळपास 161 कोटींची कमाई केली आहे. आलिया आणि रणबीरच्या या चित्रपटाने जगभरातील मार्केटमध्ये 250 कोटींहून अधिक कमाई केली आहे. बॉयकॉट ट्रेंड आणि नकारात्मक रिव्ह्यूमध्ये या चित्रपटाला काही फरक पडला नाही. चित्रपटाच्या यशाने निर्माते आणि स्टारकास्ट खूप खूश आहेत.

टॅग्स :ब्रह्मास्त्ररणबीर कपूरआलिया भटएरिका फर्नांडिस