Join us  

‘उत्तम कथानकाच्या युगात बाळा ठरेल हटके !’ : आगामी प्रदर्शनाविषयी आयुषमान खुरानाचे मत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2019 7:15 AM

शिवाय तो सामाजिक विषयावर भाष्य करेल आणि एक खोल विचार असलेला सिनेमा पाहिल्याचा अनुभव देईल.

आयुषमान खुराना हा त्याच्या कारकिर्दीच्या सर्वोत्तम टप्प्यात असून त्याने एकामागोमाग सहा हिट्स दिले आहेत. आता त्याचा ‘बाला’ प्रदर्शनासाठी सज्ज झाला असून हा सिनेमा डोक्यावर अकाली पडणाऱ्या टक्कलावर भाष्य करतो. आयुषमानचे सिनेमे हटके, अतिशय मनोरंजक असतात. शिवाय शक्य त्या मार्गाने ते समाजाला अर्थवाही संदेशही देऊन जातात.

आयुषमानच्या मते, सध्याच्या अर्थवाही संहितेच्या युगात ‘बाला’ दमदार ठरणार आहे. तो आपली वेगळी जागा निर्माण करून देशातील प्रत्येकाचे पोटभर मनोरंजनही करताना दिसेल. हा एक सर्वोत्तम सिनेमा ठरणार आहे. तसेच बाला हा आपल्या सिने-कारकिर्दीचा भाग असल्याचा सर्वाधिक अभिमान वाटत असल्याचे आयुषमान म्हणतो. या सिनेमाचे कथानक वाचताना हसून-हसून पोट दुखले होते. ते फारच विनोदी तरीही भावनिक असल्याचे त्याने कबूल केले. या सिनेमाची कथा चपखल असल्याचेही या अष्टपैलू अभिनेत्याने यावेळी सांगितले. त्याचा अलीकडचा ड्रीमगर्ल्स तुफान गाजला. सुमारे 135 कोटींचा पल्ला या सिनेमाने पार केला असून अजूनही थिएटर्समध्ये सुरू आहे.    

आयुषमान म्हणतो की, आता हटके सिनेमा हा माझा ब्रँड झाला आहे. त्याशिवाय समाजात एक संदेशही जात असल्याने प्रेक्षक माझ्या सिनेमांना पसंती देताना दिसतात. “चांगल्या सिने-प्रेमींसाठी या सिनेमात सर्वकाही आहे. हा एक पैसा वसून मनोरंजक सिनेमा असेल याची हमी मी देतो. शिवाय तो सामाजिक विषयावर भाष्य करेल आणि एक खोल विचार असलेला सिनेमा पाहिल्याचा अनुभव देईल. हा एक अतिशय विचार प्रवर्तक तरीही प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणारा पर्याय ठरणार आहे. एक अभिनेता म्हणून या कथानकाने मला आकर्षित केले. मायबाप रसिकांनी नेहमीच माझ्या इतर सिनेमांवर ज्याप्रमाणे भरभरून प्रेम केले, त्याप्रमाणे प्रतिसाद ते ‘बाला’ला देतील ही आशा मी व्यक्त करतो.”  बाला 7 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. यामध्ये आयुषमानसोबत भूमी पेडणेकर आणि यामी गौतम झळकणार आहेत.

टॅग्स :आयुषमान खुराणा