Join us

पाठलाग करणाऱ्या युवकाची श्रद्धाने अशी केली ‘गोची’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2016 17:57 IST

सर्वसामान्य युवतींनाच नव्हे तर ग्लॅमरस अभिनेत्रींनाही पाठलाग करणाऱ्या युवकांचा त्रास होतो. आता हेच पाहा ना.. श्रद्धा कपूर ही एका युवकाच्या पाठलाग ...

सर्वसामान्य युवतींनाच नव्हे तर ग्लॅमरस अभिनेत्रींनाही पाठलाग करणाऱ्या युवकांचा त्रास होतो. आता हेच पाहा ना.. श्रद्धा कपूर ही एका युवकाच्या पाठलाग करण्यामुळे प्रचंड वैतागली होती. तो युवक तिच्या प्रत्येक ठिकाणच्या कार्यक्रमांना तिला भेटण्यासाठी यायचा. श्रद्धाने अनेक वेळेला त्याची नोंद घेतली. पण तिने त्याच्या विरूद्ध कधी अ‍ॅक्शन घेतली  नाही. माणूस म्हटल्यावर कधीतरी तर वैतागणारच ना? ‘यारों की बारात’ या कार्यक्र माला ती फरहान अख्तर सोबत गेली होती. तेव्हा तिथे तिने पुन्हा त्याच युवकाला पाहिले. मग तिने एक शक्कल लढवली. तिने ठरवले की, आता याला चांगलेच सुनवायचे. तिने काय केले त्या व्यक्तीला स्टेजवर बोलवले आणि त्याला मिठी मारली. त्याची ओळख पण तिने तिचा पाठलाग करणारा युवक अशीच करून दिली. मग काय? त्याला ‘पळता भुई थोडी झाली’. सर्वांपासून तोंड लपवत तो कधी प्रेक्षकांमध्ये अदृश्य झाला हे कुणालाच कळलं नाही. बॉलिवूडची बबली गर्ल श्रद्धा आहे की नाही व्हेरी स्मार्ट?