Join us  

शाहरुख खानच्या 'डंकी'ने रिलीज आधीच कमावले कोट्यवधी, 'जवान' आणि 'पठाण'चा मोडणार रेकॉर्ड?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 8:29 AM

बॉलिवूडचा 'बादशाह' शाहरुख खानसाठी 2023 हे वर्ष खूपच खास ठरलं. आता वर्षाच्या शेवटी त्याचा 'डंकी' रिलीज होत आहे.

बॉलिवूडचा 'बादशाह' शाहरुख खानसाठी (Shahrukh Khan) 2023 हे वर्ष खूपच खास ठरलं. ४ वर्षांनंतर जबरदस्त कमबॅक करत त्याने वर्षाच्या सुरुवातीलाच 'पठाण' हा ब्लॉकबस्टर सिनेमा दिला. यानंतर काही महिन्यात रिलीज झालेल्या 'जवान' सिनेमानेही धुमाकूळ घातला. आता वर्षाच्या शेवटी त्याचा 'डंकी' (Dunki) रिलीज होत आहे. 'पठाण' आणि 'जवान' सिनेमांप्रमाणे डंकीही हिट होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. अशातच डंकीने रिलीज आधीच कोट्यवधी रुपये कमावले आहेत. 

किंग खानचा 'डिंकी' 22 डिसेंबरला रिलीज होणार आहे. रिलीजपूर्वीच या चित्रपटाचे अ‍ॅडव्हान बुकिंग सुरू झाले आहे. अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून चित्रपट चांगली कमाई करत आहे. पिंकव्हिलच्या रिपोर्टनुसार 'डिंकी'चे परदेशात अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू होऊन सात दिवस झाले आहेत. चित्रपटाने गुरुवारीच्या दिवशी 2 कोटी 50 लाख रुपयांहून अधिक कमाई केली आहे.  या आठवड्याच्या अखेरीस चित्रपट 500 हजार अमेरिकन डॉलर्स म्हणजेच 4 कोटींहून अधिक कमाई करेल असा अंदाज आहे. 

'डिंकी'पूर्वी शाहरुख खानच्या 'जवान' आणि 'पठाण' या चित्रपटांनीही अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये चांगले कलेक्शन केले होते.  अ‍ॅडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत बोलायचे झाले तर या चित्रपटाने अमेरिकेत सर्वाधिक कमाई केली आहे. बुधवारीच 'डिंकी'ने जवळपास एक कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.ऑस्ट्रेलिया आणि कॅनडामध्ये अ‍ॅडव्हान्स बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.  'डंकी'च्या रिलीज आधी शाहरुखने वैष्णोदेवीचे आणि शिर्डीत जाऊन साई बाबांचं दर्शन घेतले आहे. 

'डंकी'मध्ये शाहरुखने हार्डी ही भूमिका साकारली आहे. यासोबतच तापसी पन्नू, विकी कौशल, बोमन इरानी यांची भूमिका आहे. सिनेमाचा ट्रेलर अनेकांना आवडला असून चाहते रिलीजची वाट बघत आहेत. 

टॅग्स :शाहरुख खानडंकी' चित्रपट