Join us  

Dream Girl 2 Teaser: 'ड्रीम गर्ल २'मधून पुन्हा भेटीला येतेय 'पूजा', टीझरमध्ये दिसली 'पठाण'सोबत बोलताना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 9:12 AM

Dream Girl 2 Teaser : आपल्या आवाजाच्या जादूने लोकांना वेड लावणारी 'पूजा' आता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर आपल्या आवाजाची जादू पसरवण्यासाठी सज्ज झाली आहे. अभिनेता आयुषमान खुरानाचा नवीन चित्रपट 'ड्रीम गर्ल २' चा टीझर समोर आला आहे, ज्यामध्ये पूजा 'पठाण'सोबत बोलताना दिसत आहे.

'ड्रीम गर्ल २'(Dream Girl 2 Teaser) मधून 'पूजा' पुनरागमन करत आहे. होय, आपल्या आवाजाच्या जादूने लोकांना वेड लावणारी पूजा आता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर आपल्या आवाजाची जादू पसरवण्यासाठी सज्ज झाली आहे. अभिनेता आयुषमान खुराना(Ayushman Khurana)चा नवीन चित्रपट 'ड्रीम गर्ल २' चा टीझर समोर आला आहे, ज्यामध्ये तो पूजाच्या गेटअपमध्ये दिसत आहे. टीझर पाहून आता पूजाने कॉल सेंटर सोडल्याचे दिसते आहे आणि ती 'पठाण'सोबत बोलताना दिसते आहे.

टीझरमध्ये तुम्हाला 'पूजा' आणि 'पठाण'मधील खोडकर संभाषण ऐकायला मिळेल. पूजाचा फोन वाजला आणि तिने तो उचलला आणि म्हणाली- हॅलो, मी पूजा बोलत आहे. तू कोण आहेस? यावर शाहरुख खानच्या आवाजात समोरची व्यक्ती म्हणते, 'पूजा, मी पठाण आहे.' पूजा म्हणते, 'उफ्फ कसा आहेस माझा पठाण?' नेहमीपेक्षा श्रीमंत, पठाण म्हणतो. व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा.

पठाण पूजाला विचारतो, 'मी चार वर्षांनी तुझा आवाज ऐकतोय, तू कशी आहेस?' पूजा उत्तर देते, 'पूर्वीपेक्षा जास्त हॉट, गोंडस आणि सुंदर.' पठाण म्हणतो, 'माझा जवान लवकरच येणार आहे.' पूजा उत्तर देते, 'आणि माझी जवानी.' पठाण विचारतो, 'पूजा कधी येणार आहेस?' यावर पूजा सांगते की  'सात को साथ में आ रही है.'. पठाण म्हणतो, 'तुम्ही ७ जुलैला येताय, खरंच?'या टीझरवरून आणि 'पूजा' आणि 'पठाण' यांच्यातील संभाषणावरून हे स्पष्ट झाले आहे की आयुषमान खुराना ७ जुलैला त्याचा 'ड्रीम गर्ल २' चित्रपट घेऊन थिएटरमध्ये दाखल होणार आहे. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटात त्याच्यासोबत अनन्या पांडे, परेश रावल, राजपाल यादव, असरानी, ​​विजय राज, मनोज जोशी, सीमा पाहवा, अभिषेक बॅनर्जी आणि मनजोत सिंग असणार आहेत.

'ड्रीम गर्ल २' हा चित्रपट राज शांडिल्य दिग्दर्शित करत असून एकता कपूरची निर्मिती आहे. २०१९ मध्ये आलेल्या पहिल्या 'ड्रीम गर्ल' पेक्षा 'ड्रीम गर्ल २' अधिक मजेदार आणि मनोरंजक असेल असे निर्मात्यांचे म्हणणे आहे. आता आयुषमान खुराना त्याच्या नव्या चित्रपटात पूजा बनून काय कमाल करतो हे पाहावे लागेल.

टॅग्स :आयुषमान खुराणाड्रिम गर्लअनन्या पांडे