Join us  

सलमान खानच्या व्हॅनिटी व्हॅनचे फोटो तुम्ही पाहिले का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 6:02 PM

सलमान सध्या त्याच्या भारत या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कॅटरिना कैफ दिसणार असून या चित्रपटाची जोरदार चर्चा मीडियात सध्या रंगली आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले असून सलमान जास्तीत जास्त वेळ या चित्रपटाच्या सेटवर घालवत आहे.

आज सलमान खानला बॉलिवूडमधील सुपरस्टार मानले जाते. या दबंग खानने गेल्या काही वर्षांत बॉलिवूडमध्ये आपले एक स्थान निर्माण केले आहे. सलमान खानचे चित्रपट म्हटले की, ते हिट होणारच असे म्हटले जाते. सलमानचे फॅन्स तर त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात असतात. सलमानच्या चित्रपटाप्रमाणेच त्याच्या खाजगी आयुष्याविषयी जाणून घेण्यात देखील त्याच्या फॅन्सना रस असतो. 

सलमान खानचे घर कसे आहे, त्याचे बिईंग ह्युमनचे ऑफिस कसे आहे याची उत्सुकता त्याच्या फॅन्सना लागलेली असते. कलाकार चित्रीकरण करत असताना त्यांच्यासोबत त्यांची व्हॅनिटी व्हॅन ही सतत असते. सलमानची व्हॅनिटी व्हॅन कशी आहे, त्यात काय काय सोयी आहेत हे देखील जाणून घ्यायचा त्याचे फॅन्स प्रयत्न करत असतात. सलमानची व्हॅनिटी व्हॅन कशी आहे याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

सलमान सध्या त्याच्या भारत या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कॅटरिना कैफ दिसणार असून या चित्रपटाची जोरदार चर्चा मीडियात सध्या रंगली आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले असून सलमान जास्तीत जास्त वेळ या चित्रपटाच्या सेटवर घालवत आहे. सलमानच्या या चित्रपटाचे निर्माते निखिल नमित आहेत. त्यांनी सलमानच्या फॅन्ससाठी खास सलमानच्या व्हॅनिटी व्हॅनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो पाहून सलमानची व्हॅनिटी किती मोठी आहे आणि त्यात किती सुविधा आहेत हे कळत आहे. सलमानची व्हॅनिटी व्हॅन भली मोठी असून त्याच्यात सलमानला आराम करायला बेड आहे. त्याच्या व्हॅनिटी व्हॅननमध्ये एक भले मोठे मेकअप रूम आहे. याचशिवाय त्याच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये स्टडी रूमदेखील आहे. तो तिथेच बसून चित्रपटांच्या स्क्रिप्ट वाचतो आणि दृश्यासाठी रिहर्सल करतो.

या व्हॅनिटी व्हॅनमध्ये टॉयलेट, शॉवर घेण्यासाठी बाथरूम आहे. तसेच या व्हॅनिटी व्हॅनमधील लाइटिंगसुद्धा अॅडजस्ट करता येते. सलमानची ही व्हॅनिटी व्हॅन पाहाता एखाद्या घराप्रमाणेच ही व्हॅन असल्याच्या प्रतिक्रिया त्याचे फॅन्स देत आहेत. 

 

टॅग्स :सलमान खानभारत सिनेमा