Join us  

फोटोत डान्स करणाऱ्या चिमुकलीला ओळखलंत का?, 'सेक्रेड गेम्स'मधील बोल्ड सीनमुळे आली होती चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 2:03 PM

कलाकार मंडळी बऱ्याचदा त्यांच्या बालविश्वात रमताना दिसतात. त्यामुळे ते सोशल मीडियावर आपल्या बालपणीचे फोटो शेअर करत त्या आठवणीत रमतात. अशाच एका अभिनेत्रीच्या बालपणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

कलाकार मंडळी बऱ्याचदा त्यांच्या बालविश्वात रमताना दिसतात. त्यामुळे ते सोशल मीडियावर आपल्या बालपणीचे फोटो शेअर करत त्या आठवणीत रमतात. अशाच एका अभिनेत्रीच्या बालपणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोत ती डान्स करताना दिसत आहे. तुम्ही या अभिनेत्रीला ओळखलंत का? नाही. आम्ही तुम्हाला सांगतो, ही अभिनेत्री म्हणजे सेक्रेड गेम्स फेम राजश्री देशपांडे (Rajashree Deshpande).

अभिनेत्री राजश्री देशपांडे हिने इंस्टाग्रामवर बालपणीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती डान्स करताना दिसत आहे. याआधी देखील तिने बालपणीचे फोटो शेअर केले आहेत. तसेच ती बऱ्याचदा फॅमिली फोटो शेअर करत असते. 

वर्कफ्रंटबद्दल...राजश्री एक गुणी अभिनेत्री आहे. अनेक मराठी चित्रपट व मालिकांमध्ये तुम्ही तिला बघितलं असेलच. आमिर खानच्या ‘तलाश’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. राजश्री देशपांडेने बॉलिवूडमध्ये 'तलाश', 'किक', 'सेक्सी दुर्गा', 'मॉम' आणि 'कॉलर बॉम्ब' असे अनेक चित्रपट केले आहेत. पण तिला खरी लोकप्रियता मिळाली ती ‘सेक्रेड गेम्स’ या वेबसीरिजमुळे. या सीरिजमध्ये तिने दिलेले काही न्यूड सीन्स खूप चर्चेत आले होते. या सीरिजमध्ये तिने गँगस्टर गणेश गायतोंडेच्या पत्नीची भूमिका साकारली होती. यात राजश्रीची भूमिका म्हणायला लहान पण तेवढीच महत्त्वपूर्ण होती.   

टॅग्स :सॅक्रेड गेम्स