Join us  

ओळखा पाहू? एकेकाळी पारलेजी खाऊन उदरनिर्वाह करणारा हा अभिनेता आज आहे बॉलिवूडचा राजकुमार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2023 4:17 PM

हा चिमुरडा आता मोठा होऊन बॉलिवूडचा सशक्त अभिनेता बनला आहे.

सिनेइंडस्ट्रीत कलाकार मंडळी यश मिळवण्यासाठी ज्योतिषशास्त्राचा आधार घेताना दिसतात. यासाठी ते वेगवेगळे प्रयोग करुन पाहतात. काही जण त्यांच्या नावात बदल करतात तर काही त्यांच्या नावात अतिरिक्त अक्षरे जोडतात. असं केल्यानंतर काही यशस्वी होतात तर काही अपयशी ठरतात. फोटोत दिसणारा हा चिमुरडादेखील अशाच स्टार्सपैकी एक आहे. ज्यानं अंक शास्त्रानुसार आपल्या नावात थोडासा बदल केलाय आणि आता तो बॉलिवूडमधला सर्वांचा लाडका राजकुमार बनला आहे.        

हा चिमुरडा आता मोठा होऊन बॉलिवूडचा सशक्त अभिनेता बनला आहे. जो आपल्या अभिनयाने लोकांना प्रभावित करत आहे, त्याचे नाव आहे राजकुमार राव (Rajkumar Rao). राजकुमार रावने एका मुलाखतीत त्याच्या स्ट्रगलबद्दल सांगितले. तो म्हणाला की, मुंबईत अनेक रात्र फक्त पारले जी बिस्किट खाऊन घालवल्या आहेत. एक काळ असा होता जेव्हा त्याच्या खात्यात फक्त १८ रुपये असायचे. फिल्मी पार्श्वभूमी नसतानाही, राजकुमार रावने बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. त्याने त्याच्या कौशल्याच्या जोरावर रुपेरी पडद्यावर खूप प्रसिद्धी मिळवली आहे. पण त्याच बरोबर संख्याशास्त्राची देखील त्याला मदत झाली आहे. राजकुमार राव त्याच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये अतिरिक्त एम वापरतो. अंकशास्त्राच्या सल्ल्याने त्याने हे कृत्य केल्याचे सांगितले जाते आणि त्याचा फायदाही त्याला झाला आहे.

राजकुमार रावने आपल्या चित्रपट कारकिर्दीत प्रत्येक शैलीतले चित्रपट केले आहेत आणि आपले अभिनय कौशल्य सिद्ध केले आहे. यादरम्यान त्याला काही चांगले -वाईट अनुभवांनाही सामोरे जावे लागले. स्त्री चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान राजकुमार रावला भुताटकीचा अनुभव आला होता. खुद्द राजकुमार रावने खुलासा केला होता की, चंदेरीमधील शूटिंगदरम्यान आजूबाजूच्या लोकांनी शूटिंगचं लोकेशनवर भुताटकी असल्याची माहिती दिली होती. यानंतरही क्रूने रात्री शूटिंग सुरूच ठेवले. दरम्यान, एक मुलगा उंचावरून पडला, तो म्हणाला की त्याला कोणीतरी ओढत होते. पण तिथे लोकांना काहीच दिसलं नाही. 

टॅग्स :राजकुमार राव