तुम्ही ऐकलतं का? होय, आथिया शेट्टीला करायचीय ‘अॅक्शन’ !
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2017 14:30 IST
अभिनेता सुनील शेट्टीची लाडकी लेक आथिया शेट्टी सध्या उठता-बसता एकच स्वप्न बघतेय. होय, आथियाला एक अॅक्शन चित्रपट करायचाय. कधी ...
तुम्ही ऐकलतं का? होय, आथिया शेट्टीला करायचीय ‘अॅक्शन’ !
अभिनेता सुनील शेट्टीची लाडकी लेक आथिया शेट्टी सध्या उठता-बसता एकच स्वप्न बघतेय. होय, आथियाला एक अॅक्शन चित्रपट करायचाय. कधी एकदा अॅक्शन अवतारात दिसते, असे आथियाला झालेय. मला अॅक्शन चित्रपट करायचेय, असे ती ज्याला-त्याला सांगत सुटलीय. (सांगणार का नाही, बॉलिवूडमध्ये टिकायचे तर सगळेच यायला हवे ना?)आथियाच्या बºयाच मैत्रिणी सध्या धडाधड अॅक्शन करताना दिसत आहेत. सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नू यांचा अॅक्शन अवतार आपण अलीकडे बघितला. कदाचित त्यांच्याकडे बघून आथियाला सुद्धा अॅक्शनपटाचा मोह झाला असावा. खरे तर आथियाला बॉलिवूडमध्ये बे्रक देण्याचे सगळे श्रेय जाते ते सलमान खान याला. सलमान खानच्या बॅनरखाली निखिल अडवाणी दिग्दर्शित‘हिरो’मधून आथियाने बॉलिवूड डेब्यू केला होता. पण ‘हिरो’ सुपरडुपर फ्लॉप ठरला. लवकरच आथिया ‘मुबारका’ या चित्रपटात दिसणार आहे.अनिस बज्मी यांच्या आगामी ‘मुबारका’मध्ये अनिल कपूर, इलियाना डिक्रुझ, अर्जून कपूर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.( याचित्रपटाच्या शूटिंग दरम्यान आथियाचे नाव अर्जुन कपूरशी जोडण्यात येत आहे. मात्र या बातम्या तिने अफवा असल्याचे सांगितलेयं. ) पण हा चित्रपट रोमॅन्टिक-कॉमेडी प्रकारात मोडणार आहे. त्यामुळे अॅक्शन करायची तर अॅक्शनपट मिळवायला हवा. अशात, सलमानने आथियाची ही इच्छा ऐकली असावी, अशी आशा करू यात. शेवटी अॅक्शनची जाण सलमानऐवढी दुसºया कुणाला असणार?ALSO READ : सूरज पांचोलीच्या जीवनात आथियाचे स्थान महत्त्वाचे!अलीकडे एका कॉस्मेटिक ब्राण्डच्या जाहिरातीत आथिया बाईकर लूकमध्ये दिसली होती. तिच्या या बदलेल्या अवताराची चांगली प्रशंसाही झाली होती. आता केवळ प्रतीक्षा आहे, ती आथियाच्या अॅक्शनपटाची...सो, वेट अॅण्ड वॉच...