Join us

Do you know the reason !! कान्सच्या रेड कार्पेटवर नसणार दीपिका पादुकोण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2017 10:27 IST

कॅटरिना कैफची ‘छुट्टी’ करून दीपिका पादुकोणने एका इंटरनॅशनल कॉस्मेटिक ब्रँडचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडरपद मिळवले. आता या ब्रॅण्डशी कनेक्शन म्हणजे, कान्स ...

कॅटरिना कैफची ‘छुट्टी’ करून दीपिका पादुकोणने एका इंटरनॅशनल कॉस्मेटिक ब्रँडचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडरपद मिळवले. आता या ब्रॅण्डशी कनेक्शन म्हणजे, कान्स फेस्टिवलला जायची संधी.   येत्या १७ व १८ मे रोजी कान्स फिल्म फेस्टिवल होणार आहे. या ब्रँडमुळे दीपिका येत्या कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर दिसणार, अशी शक्यता व्यक्त केली गेली. पण नाही, यंदा तरी दीपिका कान्सच्या रेड कार्पेटवर दिसणार नाहीयं.काल-परवा एका अवार्ड फंक्शनमध्ये खुद्द दीपिकानेच हा खुलासा केला. फ्रान्सच्या कान्स शहरात रंगणाºया या फेस्टिवलमध्ये जगभरातील चित्रपट व ग्लॅमर इंडस्ट्रितील सेलिब्रिटीज सामील होतात. बॉलिवूड अनेक वर्षांपासून या फेस्टिवलमध्ये सामील होत आले आहे.  आधी ऐश्वर्या राय बच्चन आणि नंतर सोनम कपूर या फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर दिसत आल्या आहेत. यंदा ऐश्वर्या व सोनमसोबत दीपिकाही या रेडकार्पेटवर दिसेल, असे वाटले होते. पण दीपिकाने सगळ्यांचीच निराशा केली. मी कान्सला जात नाहीय. सध्या तरी मी माझे सगळे लक्ष ‘पद्मावती’वर केंद्रीत केले आहे, असे तिने सांगितले. एकंदर काय तर संजय लीला भन्साळींच्या ‘पद्मावती’मुळे दीपिका कान्सला जाऊ शकणार नाहीय. कारण भन्साळी आपल्या स्टार्सला मुद्यावरून भरकटू देत नाहीत. कदाचित दीपिकालाही त्यांनी हाच सल्ला दिला असावा. ALSO READ : यंदा कान्सच्या रेड कार्पेटवर दिसणार दीपिका पादुकोणचा जलवा?याआधी २०१० मध्ये दीपिका कान्सच्या रेड कार्पेटवर उतरली होती. रोहित बाल याने डिझाईन केलेल्या साडीत दीपिकाने कान्सच्या रेडकार्पेटवर आपल्या सौंदयार्चा जलवा दाखवला होता.   गतवर्षी ऐश्वर्या राय बच्चन पर्पल लिपस्टिक लावून कान्सच्या रेड कार्पेटवर दिसली होती. यामुळे तिला बºयाच टिकेला सामोरे जावे लागले होते. याऊलट सोनम कपूरने तिच्या आगळ्या-वेगळ्या फॅशन स्टाईलने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.